भीमा-कोरेगाव प्रकरणात गुन्हे रद्द करा : रामदास आठवले  

भीमा-कोरेगाव प्रकरणी आंदोलकांवरील गुन्हे रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी आठवले यांनी यावेळी केली.
ramdas_athawale
ramdas_athawale

मुंबई  : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यापक रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली आहे. रिपाइंचे गट अनेक लोक स्थापन करतात.

मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपाइं आम्हीच साकार करू, असे सांगत सर्वांनी नवे नवे गट काढण्यापेक्षा आंबेडकरांच्या स्वप्नांतील एकसंघ रिपाइं आपण साकार करु या, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे रिपाइंच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत ते बोलत होते. यावेळी सभेचे आयोजक रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, सुमंतराव गायकवाड, राजा सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष आम्ही संपूर्ण देशात पोहोचविला असून ईशान्य भारतातील दुर्गम राज्यांतही रिपाइं पक्ष पोहोचल्याचे आठवले म्हणाले.

महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे, त्यात तीन वर्षे भाजप आणि दोन वर्षे शिवसेनेला असे मुख्यमंत्री पदाचे वाटप करावे, असे मी सुचविले होते. मात्र दोघांनी माझे न ऐकल्यामुळे सत्ता हातातून गेली आहे .

असे सांगत, कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी करुन मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांचे रामदास आठवले यांनी अभिनंदन केले.

भीमा-कोरेगाव प्रकरणी आंदोलकांवरील गुन्हे रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी आठवले यांनी यावेळी केली. तसेच झोपडीवासीयांना 400 किंवा 500 चौरस फुटाचे घर द्यावे, अन्यथा प्रकल्प राबवू नये. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील गरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आठवले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com