Ramdas Athavle and Ulhasnagar | Sarkarnama

उल्हासनगरात युती आणि बंडखोर दोघेही म्हणतात आम्हाला रामदास आठवलेंचा  पाठिंबा 

दिनेश गोगी
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

उल्हासनगर : देशात आणि राज्यात शिवसेना-भाजपा-आठवले गटाची युती असताना उल्हासनगरातून आठवले गटाचे नगरसेवक भगवान भालेराव यांनी बंडखोरी केली आहे.

ते अपक्ष उमेदवार आहेत. विशेष म्हणजे भालेराव यांच्या पाठिशी आठवले गट असल्याचे पत्रकार परिषदेत जाहिर करण्यात आल्याने युती आणि बंडखोर अपक्ष भालेराव यांच्यात रामदास आठवले यांच्या फोटोची विभागणी होणार आहे.

आठवले गटाच्या वतीने युतिकडे काही जागांची मागणी केली होती. त्यात आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले समजले जाणारे उल्हासनगर व अंबरनाथ च्या जागांचा समावेश होता.युतीने ह्या जागा सोडल्या नाहीत. त्यामुळे उल्हासनगरातून नगरसेवक भगवान भालेराव आणि अंबरनाथ मधून रामभाऊ तायडे हे आठवले गटाचे दोघे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 

त्यांना पक्षाचा पाठिंबा असून आम्ही युती सोबत मैत्रीपूर्ण लढत लढवत असल्याची माहिती आठवले गटाचे पक्ष निरीक्षक सुरेश बारसिंग यांनी उल्हासनगरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

2004 च्या विधानसभेत पप्पू कलानी हे आठवले गटाच्या तिकीटावर निवडून आले होते याकडे देखील बारसिंह यांनी लक्ष वेधले.या प्रसंगी भगवान भालेराव,रामभाऊ तायडे, युवक अध्यक्ष समाधान निकम उपस्थित होते. यावेळी भगवान भालेराव यांचा जाहिरनामा देखील प्रकाशित करण्यात आला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख