वाकडीच्या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देऊ : आठवले 

वाकडी (ता. जामनेर) येथील पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देऊ, असे आश्‍वासन आज सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. आठवले यांनी वाकडीला भेट देऊन पीडित कुटुंबातील सदस्यांची आज भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
वाकडीच्या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देऊ : आठवले 

वाकोद (ता. जामनेर), : वाकडी (ता. जामनेर) येथील पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देऊ, असे आश्‍वासन आज सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. आठवले यांनी वाकडीला भेट देऊन पीडित कुटुंबातील सदस्यांची आज भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी समाजकल्याण विभागाकडून पीडित कुटुंबाला एक लाख व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे पन्नास हजार रुपयांची मदत दिली. मानवतेला कलंक लावणाऱ्या घटनेचा त्यांनी यावेळी निषेध केला. फुले, शाहू व आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असा प्रकार घडणे अतिशय निंदनीय आहे. शासन या कुटुंबाच्या पाठीशी आहे. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. 

आणखी दोघांना अटक
वाकडी (ता. जामनेर) येथे अल्पवयीन मुलांना अमानुष मारहाण प्रकरणी काल (15 जून) मध्यरात्री अजित कासम तडवी व शकूर सरदार तडवी (दोघे रा. वाकडी, ता. जामनेर) यांना पहूर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात आता आरोपींची संख्या चार झाली आहे. या घटनेतील दोघांना आधीच अटक करून त्यांना न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले आहेत. या घटनेतील मारहाणीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत एकाने काठी आणून दिल्याचे स्पष्ट दिसते, तर दुसऱ्याने मारहाणीसाठी मदत केली केली. यामुळे अजित तडवी व शकूर तडवी यांना अटक केल्याची माहिती पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मोहन बोरसे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com