रामदास आठवले दुबईत; पण त्यांना शिवसेना-भाजप युतीची चिंता

रामदास आठवले दुबईत; पण त्यांना शिवसेना-भाजप युतीची चिंता

पुणे : शिवसेनेने अन्य कोणत्याही पर्यायाचा विचार न करता भाजप या आपल्या जुन्या मित्रासोबत एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करावे. भाजपानेदेखील ही दोन पाऊले मागे जाऊन महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेने सोबत तडजोड करून सत्ता स्थापन करावे, अशी भूमिका मांडत आता या दोन्ही पक्षात दिलजमाईसाठी आपण स्वत: प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

आठवले सध्या दुबईत आहेत. भारतात परतल्यानंतर पुढच्या दोन दिवसांत या दोन्ही पक्षातील नेत्यांना भेटून दिलजमाईसाठी प्रयत्न करणार असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. भाजपा-सेनेची युती 30 वर्षे जुनी आहे. भाजपाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, शिवसेना विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. महायुतीला राज्यातील्या जनतेने बहुमत दिले आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे फार चांगले नाही, असे आठवले यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस सोबत योग्य दिशेने चर्चा चालू आहे, असे म्हटले असले तरी त्यांची कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सोबत युती करण्याची दिशा चुकीची आहे. त्यांनी राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी चर्चा करण्याची योग्य दिशा भाजप आहे. कार्यकर्त्यांना सत्ता देण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, अशी भूमिका आठवले यांनी मांडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com