रामदास आठवले 'तो' पराभव अजूनही विसरलेले नाहीत 

किमान सात ते आठ लाख मते मिळवून सर्वाधिक मतांनी मी विजयी होईन, असे वाटत होते.
Ramdas_Athavle
Ramdas_Athavle

अकोले  : ''शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मी निवडणुकीसाठी उभा असताना, दक्षिण नगरमधून ज्येष्ठ नेते (स्व.) बाळासाहेब विखे पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही; परिणामी विजय निश्‍चित असणाऱ्या शिर्डीत माझा पराजय झाला,'' अशी खंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सुगाव बुद्रुक येथील पक्षाचे राज्य सचिव विजय वाकचौरे यांच्या निवासस्थानी झाला. त्या वेळी मंत्री आठवले बोलत होते. राजाभाऊ कापसे, श्रीकांत भालेराव, काकासाहेब खंबाळकर, भीमराज बागूल, श्रावण वाघमारे, सुरेंद्र थोरात, सुनील साळवे आदी उपस्थित होते.

मंत्री आठवले म्हणाले, "लोकसभेच्या 2009च्या निवडणुकीत राज्यात सर्वांत सुरक्षित, तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी व रिपब्लिकन पक्षाची सर्वाधिक मते असणारा शिर्डी मतदारसंघ होता. किमान सात ते आठ लाख मते मिळवून सर्वाधिक मतांनी मी विजयी होईन, असे वाटत होते. मला शिर्डीतून उमेदवारी मिळाली; परंतु बाळासाहेब विखे पाटील यांना दक्षिणेतून उमेदवारी मिळाली नाही. परिणामी, विजय वाकचौरे यांच्या शिर्डीत मला पराभवाला सामोरे जावे लागले.''

" राजकारणात चढ-उतार, जय-पराजय होतच असतात. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मला राज्यसभेवर घेऊन मंत्री केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांची शक्ती, यामुळे दलित समाज गुलामगिरी नष्ट करून प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. राजकारणाचे धडे घेत आहे,'' असे आठवले म्हणाले. प्रास्ताविक शांताराम संगारे यांनी केले.


एक कोटी सभासद नोंदणीचे उद्दिष्ट
मंत्री आठवले म्हणाले, " डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने पक्ष चालविणे कोण्या येऱ्या-गबाळ्याचे काम नाही. भारतासह जगात रिपब्लिकन पक्ष पोचला. आजपासून सभासदनोंदणीचा पहिला टप्पा सुरू असून, देशात एक कोटी, तर महाराष्ट्रात 60 ते 70 लाखांवर सभासदनोंदणी करायची आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com