संजय राऊतांपेक्षा माझे शरद पवारांशी अधिक जवळचे संबंध - रामदास आठवले

फक्त शिवसेनेच्या मंत्र्यांचा शपथविधी शिवजीपार्कवर होईल, असा दावा संजय राऊत यांनी करू नये. शिवाजी पार्कवर शपथविधी केवळ शिवसेनेचा नाही तर भाजपसह शिवसेना आरपीआय महायुती च्या मंत्र्यांचा शपथविधी झाला पाहिजे असे सांगत संजय राऊत यांनी शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे हा आग्रह सोडावा आणिकाँग्रेस राष्ट्रवादी च्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याचा दुराग्रह सोडावा, असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
Ramdas Athavale - Sanjay Raut - Sharad Pawar
Ramdas Athavale - Sanjay Raut - Sharad Pawar

मुंबई : फक्त शिवसेनेच्या मंत्र्यांचा शपथविधी शिवजीपार्कवर होईल, असा दावा संजय राऊत यांनी करू नये. शिवाजी पार्कवर शपथविधी केवळ शिवसेनेचा नाही तर भाजपसह शिवसेना आरपीआय महायुती च्या मंत्र्यांचा शपथविधी झाला पाहिजे असे सांगत संजय राऊत यांनी शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे हा आग्रह सोडावा आणि काँग्रेस राष्ट्रवादी च्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याचा दुराग्रह सोडावा, असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. 

राऊत यांनी हे लक्ष्यात घ्यावे की  त्यांच्या पेक्षा अधिक जवळचे संबंध माझे शरद पवारांशी आहेत. त्यामुळे लवकरच मी शरद पवार यांची भेट घेणारआहे असे वक्तव्य  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी त्यांच्या बांद्रा पूर्वेतील संविधान निवासस्थानी केले. 

शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचा आग्रह सोडावा; शिवसेनेने उपमुख्यमंत्री पद आणि 16 मंत्रीपदांचा भाजप चा  प्रस्ताव स्वीकारावा;  त्यात आणखी दोन मंत्रीपदे शिवसेनेला वाढवून द्यावीत यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगत रामदास आठवले यांनी संजय राऊत यांना लवकर महायुतीच्या सरकारचा शपथविधी होईल, अशी भूमिका घेण्याचा सल्ला दिला. 

जनतेने भाजप शिवसेनेला बहुमताचा जनादेश दिला आहे. त्या विपरीत भूमिका शिवसेनेने घेऊ नये. शरद पवारांचा पाठिंबा फक्त संजय राऊत मिळवू शकतात असे नाही. माझे शरद पवारांशी अधिक जवळचे संबंध आहेत. भाजपचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री असे सत्तवाटप करून महाराष्ट्राच्या हितासाठी लवकर सरकार स्थापन करावे ही माझी भूमिका आहे. पण वेळ पडल्यास आपण लवकर शरद पवार यांची भेट घेणार असल्याचेही आठवले यावेळी म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com