महायुतीने मित्रपक्षांना चार मंत्रीपदे द्यावीत : रामदास आठवले

''विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमताचा जनादेश मिळाला आहे.त्यामुळे भाजप शिवसेनेने एकत्र येऊन महायुती चे सरकार स्थापन करावे अन्य कोणत्याही पर्यायाचा विचार दोन्ही पक्षांनी करू नये. महायुती चे लवकर सरकार स्थापन करून चार मित्र पक्षांना प्रत्येकी एक या प्रमाणे चार मंत्रीपदे देण्यात यावीत त्यात रिपाइं ला कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावे,'' अशी मागणी करणारे ठराव आज महायुती च्या मित्रपक्षांच्या बैठकीत सर्वसंमतीने मंजूर करण्यात आल्याची माहिती रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी पत्रकारांना दिली.
Ramdas Athavale
Ramdas Athavale

मुंबई : ''विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमताचा जनादेश मिळाला आहे.त्यामुळे  भाजप शिवसेनेने एकत्र येऊन महायुती चे सरकार स्थापन करावे अन्य कोणत्याही पर्यायाचा विचार दोन्ही पक्षांनी करू नये. महायुती चे लवकर सरकार स्थापन करून चार मित्र पक्षांना प्रत्येकी एक या प्रमाणे चार मंत्रीपदे देण्यात यावीत त्यात रिपाइं ला कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावे,'' अशी मागणी करणारे ठराव आज महायुती च्या मित्रपक्षांच्या बैठकीत सर्वसंमतीने  मंजूर करण्यात आल्याची माहिती रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी पत्रकारांना दिली. 

रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांच्या सुरुची इमारतीतील शासकीय निवासस्थानी महायुतीच्या मित्रपक्षांची  बैठक आज केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत झाली. त्या बैठकीला रासपचे नेते महादेव जानकर, शिवसंग्राम चे प्रमुख आ. विनायक मेटे. रयत क्रांती संघटना प्रमुख सदाभाऊ खोत, तसेच रिपाइं चे  राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य अध्यक्ष भुपेश थुलकर, शिवसंग्रामचे राज्य उपाध्यक्ष संदीप पाटील, रासपचे नेते बाळासाहेब दौडतले, महाराष्ट्र क्रांती संघटनेचे नेते सुरेश पाटील,  काकासाहेब खंबाळकर, गौतम सोनवणे,  सुरेश बारशिंग, हेमंत रणपिसे आदी मान्यवर उपस्थित होते. 
  
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने जनादेशाचा आदर करून भाजप शिवसेने एकत्र येऊन मित्रपक्षांना विश्वासात घेऊन महायुती चे  सरकार स्थापन करावे, तसेच भाजप च्या विधिमंडळ पक्षनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची  निवड झाल्याबद्दल अभिनंदन करणारा ठराव या बैठकीत करण्यात आला. महायुती चे सरकार स्थापन करताना मित्रपक्षांना प्रत्येकी एक अशी चार मंत्रीपदे देण्यात यावीत. त्यात रिपाइंला कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी करणारे ठराव आजच्या मित्रपक्षांच्या बैठकीत करण्यात आले. 

महाराष्ट्रात  एकूण 43 मंत्रीपदांचे मंत्रिमंडळ साकारता येते त्यात  मित्रपक्षांना चार मंत्रीपदे आणि शिवसेनेला किमान 15 मंत्रीपदे दिली तरी आमची काही हरकत नाही.असे सांगत शिवसेना भाजप ने एकत्र  येऊन सरकार स्थापन करावे अशी सूचना ना रामदास आठवले यांनी शिवसेना भाजप दोन्ही पक्षांना केली आहे.  1995 मध्ये शिवसेनेचे जास्त आमदार असल्याने त्यांचाकडे 5 वर्षे मुख्यमंत्रीपद होते. त्याप्रमाणे आता भाजपचे जवळपास दुप्पट आमदार असल्याने देवेंद्र फडणवीसच 5 वर्षे मुख्यमंत्री राहतील,  त्यासाठी भाजप शिवसेने एकत्र सरकार स्थापन करावे असे मत आठवले यांनी व्यक्त केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com