दिल्लीतील अवजड उद्योग खात शिवसेनेने बदलून घ्यावं : रामदास आठवले

..
Ramdas_Athavle
Ramdas_Athavle

मुंबई : भाजप आणि शिवसेना जुने मित्र आहेत. या दोन पक्षात अनेकदा वाद झाले पण मार्ग काढले गेले आहेत .  2014 ला दोन्ही पक्ष वेगळे लढले पण सरकार एकत्र  स्थापन केले होते , असा सल्ला  केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला दिला आहे . 

 भाजपच्या 120 पर्यंत जागा आहेत. शिवसेनेकडे 61 आमदार आहेत. भाजपकडे जास्त आमदार  आहेत . शिवसेनेने 50-50 चा हट्ट सोडावा.  शिवसेनेने काही मंत्रिपद घ्यावीत. वाटल्यास दिल्लीतील अवजड उद्योग खात शिवसेनेने बदलून घ्यावं, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे . 

अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा  फॉर्म्युला नको. हा मेनी होणारा नाही. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊ नये. पुढच्या काळात शिवसेनेच्या जास्त सीट आल्या तर त्यांचा मुख्यमंत्री होऊ शकतो . 

आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याच्या घोषणा होत आहेत याबाबत आपले मत मांडताना रामदास आठवले म्हणाले, आदित्य ठाकरे हे अजून राजकारणात  नवे आहेत .  मुख्यमंत्रीपद सांभाळणं त्यांना अवघड आहे. तशी वेळ आल्यावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे.   

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पाठिंब्या बाबत चर्चा  सुरू असली तरी   त्यांच्यात  सहमती नाहीय. राष्ट्रवादीने शिवसेनेच्या प्रस्तावाला दाद देऊ नये. त्यासाठी मी शरद पवार यांना भेटणार आहे,असेही श्री. आठवले म्हणाले. 

मी उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील या दोघांना भेटणार आणि त्यांच्यातील वाद दूर करणार आहे . मुख्यमंत्री पदाबाबत विनाकारण संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी आढवेढे घेऊ नयेत , असेही श्री. आठवले म्हणाले. 

मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी दोन पावलं मागे येऊन सत्ता स्थापन करावी. ठरलेलं आहे मग घोड कुठे अडलेलं आहे? छोट्या भावाने मन मोठं करून मोठ्या भावाला साथ दिली पाहिजे. सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून देवेंद्र फडणवीस झाले पाहिजेत असे मला वाटते . 

अब्दुल सत्तर काहीही म्हणाले तर भाजप शिवसेनेला  मुख्यमंत्री पद देणार नाही, त्या ऐवजी चांगली खाती शिवसेनेने घ्यावी , असेही ते म्हणाले . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com