Ramdas Athavale to Adopt Leopard | Sarkarnama

रामदास आठवले सलग तिसऱ्या वर्षी बिबट्या दत्तक घेणार 

सचिन सावंत 
गुरुवार, 20 जून 2019

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फ़े दरवर्षी वन्य प्राणी दत्तक योजना राबविली जाते. त्यानुसार रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले हे बिबट्यादत्तक घेणार आहेत. त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया शनिवारी 22 जून रोजी दुपारी 1 वाजता बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होणार आहे. 

दहिसर : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फ़े दरवर्षी वन्य प्राणी दत्तक योजना राबविली जाते. त्यानुसार रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले हे बिबट्यादत्तक घेणार आहेत. त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया शनिवारी 22 जून रोजी दुपारी 1 वाजता बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होणार आहे. 

एका पॅंथरने दुसऱ्या पॅंथरला दत्तक घेण्याचा सोहळा पाहण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक रिपाइं दहिसर तालुका अध्यक्ष दिलीप वाव्हळे यांनी सांगितले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तीन वर्षांपूर्वी वन्यप्राणी दत्तक योजनेत आठवले यांनी एक बिबट्या दत्तक घेतला. त्याचे नाव भीम ठेवण्यात आले. त्यानंतर सलग तिसऱ्या वर्षी याच भीम पॅंथरला आठवलेंनी दत्तक घेतले. या कार्यक्रमास रिपाइं महिला आघाडीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सीमाताई आठवले, जित आठवले,राज्यमंत्री अविनाश महातेकर उपस्थित राहणार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख