आठवलेंनी मार्केट खाल्ले; इंदोरीकर पिछाडीवर!

आठवलेंच्या 'गो करूणा गो' व्हिडीओवर डीजे गाणेही आले आहे.
ramdas aathawale hit on tiktok
ramdas aathawale hit on tiktok

पुणे: 'टिकटॉक' मराठी भाषिकांत लोकप्रिय होण्यात सर्वाधिक वाटा निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा आहे. त्यांच्या खळखळून हसवणाऱ्या डायलॉगचा वापर खरून लाखो युजर्सनी आपले लाईक आणि फोलोअर वाढवले आहेत. टिकटॉकवर इंदोरीकरांचा जलवा कायम आहे, पण केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी काही दिवसांसाठी कां होईना त्यांचे मार्केट खाल्ल्याचे पहायला मिळत आहे.

गेल्या वर्षभरात टिकटॉक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे. टिकटॉप सुरवातीच्या काळात प्रभावीपणे वापरण्यात मराठी युजर्सना अडचणी होत्या. त्यावेळी त्यांना सर्वाधिक मदत निवृत्ती महाराज इंदोरीकरांची झाली. इंदोरीकरांच्या भन्नाट डायलॉगचे व्हिडीओ सुरवातीला टिकटॉकवर टाकून मनोरंजन करण्यात येत होते. नंतर त्या डायलॉगवर युजर्स स्वत: अभिनय करायला लागले. गेल्या काही दिवसांपर्यंत टिकटॉकवर इंदोरीकरांचा फिवर होता. महिनाभरापुर्वी इंदोरीकरांवर कारवाईची मागणी झाली तेव्हा संपुर्ण मराठी टिकटॉकविश्व इंदोरीकरांच्या पाठीमागे ठाम उभे होते. महत्वाची बाब म्हणजे इंदोरीकरांच्या समर्थनार्थ व्हिडीओ पोस्ट करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या अधिक होती. 

टिकटॉकचे ट्रेंड नेहमी बदलत असतात, पण इंदोरीकरांना पर्याय असत नाही. पण गेल्या दोन दिवसांपासून रामदास आठवले सोशल मिडीयावर ट्रेडिंग आहेत. टिकटॉकवर त्यांचा 'गो करूणा गो' व्हिडीओ हिट झाला आहे. करूणा होवू नये...याचा मंत्र करूणा गो...गो करूणा (आठवलेंच्या आवाजात) असे व्हिडीओ शेकडो युजर्सनी पोस्ट केले असून त्यांचा बोलबाला आहे. आठवलेंच्या 'गो करूणा गो'मुळे इंदोरीकर मात्र थोड्या कालावधीसाठी कां होईना मागे पडल्याचे जाणवत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com