ramdas aathawale demands spetial quota for matang community | Sarkarnama

मातंग समाजाला स्वतंत्रपणे 8 टक्‍के आरक्षण द्या : आठवले 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब देऊन गौरवण्यात यावे या मागणीचे पत्र आपण केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पाठविले असल्याची माहिती यावेळी आठवले यांनी दिली. 

पुणे : लोकशाहिर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटींचा निधी देण्यात यावा, मातंग समाजाच्या विकासासाठी लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अण्णा भाऊ साठेंचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईत उभारावे या मागण्यांसह मातंग समाजाला स्वतंत्र 8 टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केले. 

अण्णाभाऊ साठे यांच्या 98 व्या जयंती निमित्त सुमननगर चेंबूर येथे आयोजित सभेत आठवले बोलत होते. यावेळी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, सिद्धार्थ कासारे, दिपकभाऊ निकाळजे, संजय डोळसे, अनिस पठाण, महादेव साळवे, विशाल तुपसुंदर, नंदकुमार साठे, रमेश घोक्षे, गणेश रावखंडे, डॉ हरीश अहिरे, हसन शेख, रवी गायकवाड, हेमंत रणपिसे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख