आजचा वाढदिवस : रामराजे नाईक-निंबाळकर, सभापती विधान परिषद.

 आजचा वाढदिवस : रामराजे नाईक-निंबाळकर, सभापती विधान परिषद.

फलटणच्या राजघराण्याचे 29 वे वंशज म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर होय. पुण्यातील गरवारे कॉलेज व फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातून एमएसस्सी केले. त्यानंतर त्यांनी एलएलएम ही कायद्यातली पदवी मिळविली. 1991 मध्ये ते फलटण पालिकेचे नगराध्यक्ष झाले. 1995 मध्ये फलटण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. राज्यातील अपक्ष 22 आमदारांना एकत्र करून रामराजेंनी शिवसेनेचे नेते व तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता. त्याच कालावधीत फलटणमध्ये मुख्यमंत्री मनोहर जोशी व रामराजेंनी फलटणमध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली. त्यामध्ये रामराजेंना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष केले. 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी रामराजेंनी राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते महसूल राज्यमंत्री झाले. 2004 मध्ये ते कॅबिनेट मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री झाले. 2013 मध्ये ते राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष झाले. मतदारसंघांच्या पुनर्रचनेत फलटण मतदारसंघ आरक्षित झाला. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. सध्या ते विधान परिषदेचे सभापती आहेत. तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com