ram temple shankaracharaya adhokshanandan | Sarkarnama

राममंदिरासाठी भाजप आणि इतर संघटनांचीआश्‍वासने वांझोटी : शंकराचार्य अधोक्षजानंद 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

मथुरा : भाजप आणि इतर संघटनांनी अयोध्येला आंदोलनाचे केंद्र न बनवून वातावरण बिघडवू नये, मंदिरासाठीची त्यांची विधाने आणि आश्‍वासने वांझोटी आहेत,असे मत शंकराचार्य अधोक्षजानंद यांनी आज व्यक्त केले. 

अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी भाजप आणि इतर पक्ष, संघटना "वांझोटे प्रयत्न' करत असून मंदिरासाठी अध्यादेश आणणे आवश्‍यक आहे, 
मात्र, हे करतानाच मुस्लिमविरोधी वातावरण निर्माण होणार नाही आणि सर्वोच्च न्यायालयाला आव्हान दिले जाणार नाही, याची काळजी घेणेही आवश्‍यक आहे, असे ते म्हणाले. 

"राममंदिर उभारणीसाठी न्यायालयातील सुनावणीला वेग आणणे अथवा कायदा करणे हे मार्ग आहेत. मात्र, या वादाबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात रोजच्या रोज होत नसल्याने अध्यादेश आणण्याखेरीच मार्ग उरलेला नाही,' असे अधोक्षजानंद म्हणाले. 

भाजप आणि इतर संघटनांनी अयोध्येला आंदोलनाचे केंद्र न बनवून वातावरण बिघडवू नये, मंदिरासाठीची त्यांची विधाने आणि आश्‍वासने वांझोटी आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख