आता, रामाचे काम  होणारच : मोहन भागवत 

  आता, रामाचे काम  होणारच : मोहन भागवत 

उदयपूर : "आता प्रभू रामाचे काम करायचे आहे, रामाचे काम होणारच आणि त्यावर देखरेखही होणार,'' असे सूचक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे सुरू असलेल्या संघाच्या द्वितीय वर्षाच्या प्रक्षिक्षण वर्गाच्या व्यासपीठावरून केले. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अयोध्येतील राम मंदिराविषयी एकही शब्द न बोलणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुन्हा राम मंदिराच्या विषयाबाबत भाष्य केले आहे. यात थेट राम मंदिराचा उल्लेख नसला तरी त्यांचा रोख त्याच दिशेने असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. भाजप सरकारच्या काळात राम मंदिराचा मुद्दा मार्गी न लागल्याने संघाने नाराजी व्यक्त केली होती. 

आता कोणाचेही सरकार आले, तरी राम मंदिराच्या कामाल सुरवात करणारच, असे संघाच्या एका नेत्याने म्हटले होते. मात्र निवडणुकीच्या प्रचारात याबद्दल संघाकडून कोणतीही वाच्यता करण्यात आली नव्हती. 

लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या दणदणीत विजयानंतर आता भागवतांच्या या वक्तव्याला महत्त्व आले आहे. सर्वोच्च न्यायालयात राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा खटला प्रलंबित आहे. आता राम मंदिराबाबत मोदी सरकारची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com