ram shinde's celebration in vidhanmandal | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : साताऱ्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांची तडकाफडकी बदली. त्यांच्या जागी रत्नागिरीचे सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राम शिंदेंनी राम कदमांना पेढा भरवला, मात्र OBC नेते जल्लोशापासून दूरच राहिले!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पंकजा मुंडे, एकनाथ खडसे हे भाजपमधील ओबीसी नेते जल्लोशात कुठेही दिसले नाहीत.

पुणे: मराठा आरक्षण अहवालावरील एटीआर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला आणि त्यानंतर भाजप- शिवसेनेच्या आमदारांनी जल्लोशाला सुरवात केली.

आज सकाळपासून सर्वांना एटीआर आणि विधेयकाची प्रतिक्षा होती. भाजप- शिवसेनेचे आमदार मात्र जल्लोशाच्या तयारीने आले होते. यादरम्यान, पंकजा मुंडे या आरक्षणाच्या टक्केवारीवरून नाराज असल्याच्या बातम्या आल्या. मात्र मुंडे यांनी तातडीने या बातम्यांचे खंडण केले. मी आरक्षण समितीची सदस्य नसल्याने त्या बैठकीतून निघून जाण्याचा संबंध नसल्याचे मुंडे म्हणाल्या. 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एटीआर दाखल केल्यानंतर भाजप- शिवसेनेचे आमदार भगवे फेटे बांधून सभागृहाबाहेर आले. त्यांनी 'जय भवानी जय शिवाजी'च्या घोषणा दिल्या. 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो' अशी घोषणाबाजी झाली. मंत्री गिरीश महाजन, ओबीसी खात्याचे मंत्री राम शिंदे यांनी आमदारांना मिठाई भरवली. राम शिंदे यांनी आमदार राम कदम यांना मिठाई भरवत जल्लोश केला. 

स्वत: ओबीसी असलेले आणि ओबीसी खात्याचे मंत्री म्हणून राम शिंदेंनी जल्लोशात आघाडी घेतली असलीतरी पंकजा मुंडे, एकनाथ खडसे हे भाजपमधील ओबीसी नेते जल्लोशात कुठेही दिसले नाहीत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख