नगरमध्ये भाजप- शिवसेनेचा नवा फॉर्म्युला 

राहत्या प्रमाणेच इतर मतदारसंघातही बदल होतील
नगरमध्ये भाजप- शिवसेनेचा नवा फॉर्म्युला 

नगर : विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांच्यात युती होऊन नगर जिल्ह्यातील जागांमध्ये बदल होणार आहे. राहता मतदार संघातील राधाकृष्ण विखे पाटील आता भाजपमध्ये आले असल्याने ही जागा भाजपला मिळणे स्वाभाविक आहे. राहत्या प्रमाणेच इतर मतदारसंघातही बदल होतील, त्यासाठी नव्याने फॉर्म्युला तयार करण्यात येणार आहे, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महाजनादेश यात्रेच्या नियोजनासंदर्भात आयोजित बैठकीनंतर ते बोलत होते. पत्रकार परिषदेस खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, माजी खासदार दिलीप गांधी उपस्थित होते. 

शिंदे म्हणाले, महाजनादेश यात्रा रविवारी (ता. 25) व सोमवारी ( ता. 26) रोजी नगर जिल्ह्यात आहे. यानिमित्त विविध ठिकाणी सभा होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात जी विकास कामे केली, त्याचा लेखाजोखा या यात्रेत मांडण्यात येणार आहे.  

रविवारी शिर्डी येथे आगमनानंतर अकोले, संगमनेर, राहुरी येथे सभा होतील. सायंकाळी सात वाजता नगर येथील गांधी मैदानात यांची विराट सभा होईल. मुक्कामी नगरला राहणार असून, सोमवारी सकाळी ते पाथर्डीकडे रवाना होतील. करंजी, तिसगाव येथे त्यांचे स्वागत होईल. त्यानंतर पाथर्डी येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पाथर्डी नंतर आष्टी आणि नंतर सायंकाळी जामखेड येथे त्यांची सभा होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com