राधाकृष्ण विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षाला खोडा करतात, राम शिंदेंची टीका 

राधाकृष्ण विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षाला खोडा करतात, राम शिंदेंची टीका 

पुणे : एकनाथ खडसे, पंकजाताई मुंडे यांच्यापाठोपाठ आता माजी मंत्री राम शिंदे यांनीही आपली खदखद व्यक्त केली असून नगर जिल्ह्यातील पराभवाला कोण जबाबदार आहे त्याचा शोध घ्यावा. राधाकृष्ण विखे यांचा भाजपला काही फायदा झाला नाही. ते ज्या पक्षात जातात त्या पक्षाला खोडा करतात अशी टीकाही शिंदे यांनी विखे यांच्यावर केली. 

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या बैठकीला रोहिणी खडसे, वैभव पिचड अनुपस्थित होते. 

उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाबाबत आढावा घेण्यासाठी माजी मंत्री आशिष शेलार आले होते. त्यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी व्यथा मांडल्या. जामखेडचे माजी आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांनीही मनातील खदखद व्यक्त केली. त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले, की पूर्वी नगर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार होते. यावेळेला ही संख्या तीनवर आली आले. ज्या राधाकृष्ण विखे यांना पक्षात घेतले त्यांचा काहीही फायदा झाला नाही. 

12.0 करून दाखवितो असे विखे म्हणत होते पण, काय झाले ? उलट भाजपचे आमदार कमी झाले. विखे यांच्या भाजप प्रवेशाचा कोणताही परिणाम झाला नाही. माझा पराभव झाला म्हणजे घात झाला असे नव्हे पण, मी पक्षाला दोष देणार नाही. पक्षाने मला आमदार, मंत्री केले. त्यामुळे पक्षाबरोबरच असेन.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com