आजचा वाढदिवस : पालकमंत्री राम शिंदे - ram shinde minister | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : पालकमंत्री राम शिंदे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 जानेवारी 2018

कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे सदस्य राज्याचे मृदू, जलसंधारण व राजशिष्टाचारमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत बाजी मारून विधानसभेत अभ्यासू मंत्री म्हणून आपले स्थान बळकट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासू मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात सर्वांत जास्त कामे मिळवून अनेक वर्षांचा बॅकलॉग भरून काढल्याची भावना या मतदारसंघात झाली आहे. जामखेड नगरपालिकेची सत्ता आपल्या ताब्यात ठेवून राजकीय घडी बांधण्यात शिंदे यशस्वी झाले. कुकडीचे पाणी, जिल्ह्यातील महामार्गाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख