मागील 50 वर्षात झाली नाहीत तेव्हढी कामे मी केली : राम शिंदे 

केंद्रात भाजपची सत्ता असून राज्यातही सत्ता येणार यात शंका नाही.मात्र कार्यकर्त्यांनी गाफील न राहता निवडणुकीच्या तयारीला लागावे.
RAM SHINDE boasts about his work
RAM SHINDE boasts about his work

कर्जत : मागील पन्नास वर्षात झाली नाहीत तेव्हढी  कामे मंत्रिपदाच्या कार्यकाळात केली. जी कामे केली त्याचा संबंधित गावातील कार्यकर्ते ग्रामस्थांनी फलक लावला त्यात गैर काय?असा प्रश्न  पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी येथे बोलताना केला . 

येथे भाजप पदाधिकारी-कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

या वेळी उपनगराध्यक्ष नामदेव राउत,प्रशिक्षक राम भोजने ,तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, सभापती साधना कदम,नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, उपसभापती प्रकाश शिंदे, धनराज कोपनर आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील एका पक्षनिष्ट कार्यकर्त्यावर कर्जत जामखेड मतदारसंघातील जनतेने दाखविलेल्या विश्वासाच्या जोरावर आणि मतरुपी आशीर्वादावर मी उभा आहे .

आमदारकीच्या  पाच आणि मंत्रीपदाच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात हक्काचा माणूस म्हणून मतदारसंघात मी विकास कामे केली . दिलेला शब्द पूर्ण तर केलाच मात्र न मागितलेली कामे देखील मी लक्षपूर्वक पूर्ण केली. शेवटी मंत्रीपदाचा फायदा जनतेला व्हावा,तो झाला याचे आत्मिक समाधान आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com