विरोधकांनी कोणतीही विकास कामे केली नाहीत : राम शिंदे

RAM_SHINDE
RAM_SHINDE

अहमदनगर:  'मी विरोधी पक्षाचा आमदार होतो तेव्हा मला फारसा निधी खेचून आणता आला नाही. 2014 मध्ये प्रथमच मी राज्यमंत्री नंतर कॅबिनेट  मंत्री झालो आणि माझ्या मतदार संघाच मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला.

अनेक प्रलंबित कामे या निधीमधून मार्गी लावले. प्रमाणितपणे जी विकासाची कामे केली ती निवडणुकीपुर्वी विविध माध्यमांचा वापर करुन जनतेला सांगितली. गाव, वस्ती, तांडा आदी ठिकाणी बॅनर लावुन प्रदर्शित केली.

मतदार संघात केलेल्या विकासाचा कार्य अहवाल मुख्यमंत्री यांना सादर केला' असे  कर्जत-जामखेडचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी सांगितले . 



पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, 'मी विकासाच राजकारण केलं आहे त्यामुळे मला विधानसभा निवडणुकीत कोणत्याही उमेदवारांचे आव्हान वाटत नाही. 1999 मध्ये गोपिनाथ मुंडे यांनी जामखेड येथील दोन तलावांचे भुमिपुजन केले होते.

त्यांतर कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची पंधरा वर्षे सत्ता होती तरी त्यांनी तलावाला निधी दिला नाही. ते दोन्ही तलाव मी पुर्ण केले व कर्जतला पाणीपुरवठा योजना सुरु केली.
 
'तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी एमआयडीसीचा प्रस्ताव सरकारला पाठवला आहे. त्यासाठी 400 के. व्ही. विधृत केंद्राची आवश्यकता आहे. त्याचे भुमिपुजन केले आहे.

ते लवरकच सुरु होईल. जो उमेदवार विधानसा निवडणूक लढवणार आहे त्यांनी केलेल्या कामाची माहिती जनतेला सांगावी लागेल. जनतेला सांगण्यासारखे एकही काम विरोधी पक्षानी केले नाही' असा टोला कोणाचे  नाव न घेता शिंदे यांनी लगावला.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com