कृषीमहाविद्यालयासाठी मंत्री राम शिंदे "कासाविस'  - ram shinde agri college jamkhed | Politics Marathi News - Sarkarnama

कृषीमहाविद्यालयासाठी मंत्री राम शिंदे "कासाविस' 

संजय मिस्कीन 
रविवार, 21 जानेवारी 2018

मुंबई : मंत्रीपदाचा लाभ मतदारसंघाला व्हावा असा आग्रह प्रत्येक मंत्र्याचा असतोच पण अशा आग्रहाची अतिघाई झाल्याने जलसंधारण मंत्री राम शिंदे मात्र कासाविस झाल्याचे चित्र आहे. 

आघाडी सरकारच्या कार्यकाळात श्रीगोंदा येथे मंजूर झालेले सरकारी कृषी महाविद्‌यालय राम शिंदे कृषीराज्यमंत्री असताना जामखेडच्या हळगांव मधे खेचून आणण्याचा अट्‌टहास केला. 1 जानेवारीला मंत्रीमहोदयाच्या वाढदिवसाची मतदारसंघाला भेट म्हणून कोणत्याही स्थितीत भूमीपुजन करण्याचा आग्रह त्यांनी मुख्यमंत्र्याकडे धरला. त्यासाठी नागपूरच्या मंत्रीमंडळ बैठकीत ऐन वेळीचा विषय म्हणून या महाविद्‌यालयाला तातडीने मान्यता दिली. 

मात्र वित्त व नियोजन, मुख्य सचिव, कृषीमंत्री यांची सदरील प्रस्तावाला मान्यताच घेण्यात आलेली नव्हती. पण, वेळ कमी असल्याने 1 जानेवारीला वाढदिवसाच्या दिवशी या सरकारी कृषी महाविद्‌यालयाचे भूमिपुजन करण्यात आले. अहिल्यादेवी कृषी महाविद्‌यालय असे नाव देखील जाहीर केले. मात्र, त्यानंतर मंत्रालयात या महाविद्‌यालयाच्या प्रस्तावाला अंतिम मंजूरी घेताना मंत्रीमहोदयांचा घाम निघत आहे. 

संबधित विभागांचा प्रस्ताव नाही. कृषी विद्‌पापिठाच्या समितीची शिफारस नाही. वित्त व नियोजनाची मान्यता नाही. निधीची तरतूद नाही. असे असताना महाविद्‌यालयाचे भूमीपुजन करण्याची अतिघाई कशासाठी असा सवाल प्रशासकिय अधिकारी करत आहेत. महाविद्‌यालयाच्या मान्यतेची प्रक्रियाच परिपुर्ण नसल्याने सदरच्या प्रस्तावार अंतिम मान्यतेची सही करण्याचे धाडस प्रशासकीय अधिकारी करत नसल्याने मंत्री राम शिंदे कात्रीत सापडले आहेत. 

या महाविद्‌यालाच्या निर्मीतीचा प्रवास देखील खडतरच आहे. सुरूवातील श्रीगोंदा येथून ते हळगांव (जामखेड) ला मंजूर केल्यानंतर रितसर निवीदा काढण्यात आल्या होत्या. मात्र, या निविदा प्रक्रियेत गडबड झाल्याने त्या रद्‌द झाली. अखेर न्यायालयात हा वाद गेल्यानंतर सरकारनेच निर्णय घेण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे परत मंत्रीमंडळाचा निर्णय घेतला मात्र आवश्‍यत नियमानुसार प्रस्तावच तयार नसल्याने मान्यते अगोदरच भुमिपूजनाचा घाट घातल्याने वाद वाढण्याचे संकेत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख