भाजप सदस्य नोंदणीत नगर जिल्हा आघाडीवर आणि कर्जत-जामखेड अग्रेसर : राम शिंदे

भाजप सदस्य नोंदणीत नगर जिल्हा आघाडीवर आणि कर्जत-जामखेड अग्रेसर : राम शिंदे

राशीन : भारताला महासत्ता बनविण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ देण्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारावे, असे आवाहन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज राशीन येथे केले. 

भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी प्रा. शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  

प्रा. शिंदे म्हणाले, की मराठा आरक्षणाच्या यशामुळे राज्यातील सर्वसामान्य माणसांचा भारतीय जनता पक्षावरचा विश्‍वास वाढला आहे. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सदस्य नोंदणी महत्त्वाची आहे. भाजपची सदस्य नोंदणी राज्यात जोमाने सुरू आहे. जिल्ह्यात ती सर्वांत आघाडीवर आहे. त्यातही कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ अग्रेसरच राहील. या वेळी शिंदे यांनी ऑनलाइन नोंदणीबाबतही मार्गदर्शन केले. उपस्थित कार्यकर्त्यांनी हातातील मोबाईल उंचावून या नोंदणीचे स्वागत केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com