ram shinde | Sarkarnama

मंत्र्यांनी मंजूर केलेले बंधारे सचिवांनी अडविले

तुषार खरात
गुरुवार, 27 एप्रिल 2017

मुंबई : जलसंधारणाची कामे दोन महिन्यांत पूर्ण करा, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पण खुद्द सरकार दरबारी जलसंधारण खात्यात मंत्री व प्रधान सचिव यांच्यातच ताळमेळ नसल्याने कामांना कोलदांडा बसला आहे. नदी पुर्नज्जीवन योजनेअंतर्गत जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी मंजूर केलेले जवळपास 100 कोटीचे बंधारे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी अडविले आहेत. त्यामुळे अतिविलंब होऊन ही कामे वेळेत पूर्ण करणे अशक्‍य होणार असल्याचे सूत्रांनी "सरकारनामा"शी बोलताना सांगितले. 

गेल्या महिन्यात 15 मार्च रोजी झालेल्या बैठकीत नदी पुर्नज्जीवन योजनेअंतर्गत राज्यभरातील विविध गावांमधील बंधा-यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी संबंधित जिल्हाधिका-यांनी प्रशासकीय मान्यता देऊन हे अहवाल राज्य सरकारकडे सादर केले आहेत. त्यानुसार गेल्या महिन्यातच मान्यतेचा आदेश (जीआर) निघण्याची आवश्‍यकता होती. पण एप्रिल महिना संपत आला तरी अद्याप बंधारे मंजुरीचा आदेश निघण्याची शक्‍यता दिसत नाही. 

मंत्री राम शिंदे यांनी आपल्या मतदारसंघातच 14 कोटी रुपयांच्या बंधा-यांचा समावेश केला आहे. त्यामुळेच गुप्ता यांनी बंधा-यांची अंतिम मंजुरी अडविल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, सध्या उन्हाळ्याचे दिवस असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्यास संधी असते. त्यामुळेच दोन महिन्यांत कामे पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार येत्या चार पाच दिवसांत या बंधा-यांना मंजुरी मिळाली नाही, तर ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे अशक्‍य होईल, असे सूत्रांनी "सरकारनामा"शी बोलताना सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख