या पाच तालुक्‍यात माणसंच राहतात, याचे भान ठाकरे-पवारांनी ठेवावे!

राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात तालुक्‍यातील गावागावतून शेतकरी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही.-आमदार राम सातपुते
ram satpute criticize state government decision
ram satpute criticize state government decision

पुणे : नीरा उजव्या कालव्याच्या हक्काचे पाणी पळविण्याविरोधात पाच तालुक्‍यातील शेतकऱ्यांबरोबरच्या संघर्षात आम्ही उतरणार आहोत. आम्ही संघर्ष करूच. मात्र, या पाच तालुक्‍यात राहणारी माणसंच आहेत, याचे भान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठेवायला हवे, अशी टीका माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी केली आहे. 

नीरा-देवधर पाणी वाटपाबाबत राज्य सरकारने नव्याने घेतलेल्या निर्णयाचा फटका उजवा कालव्यावर अवलंबून असलेल्या खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर या पाच तालुक्‍यांना बसणार आहे. या पाच तुालक्‍याच्या हक्काचे पाणी बारामतीसाठी पळविण्यात आले आहे. आघाडी सरकारच्या काळात याचपद्धतीने पाणी पळविण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यावेळी या विषयाची कुणाला फारशी माहितीदेखील नव्हती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात यात सुधारणा करून या पाच तालुक्‍यावर झालेला अन्याय दूर केला होता. मात्र. सत्ता येताच पुन्हा बारामतीकरांनी अन्यायाची मालिका कायम ठेवल्याची टीका आमदार सातपुते यांनी केला. 

आमदार सातपुते म्हणाले, " राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात तालुक्‍यातील गावागावतून शेतकरी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. पाच तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी काढून घेताना समन्यायी पाणी वाटप असा शब्दप्रयोग सरकार कसा करू शकते. सरकारला याचा जाब द्यावा लागेल. रस्त्यावर आणि विधी मंडळातही या विषयावर लोकांची भावना जोरदारपणे मांडल्याशिवाय राहणार नाही. दुष्काळी तालुक्‍यांच्या हिताचा विचार न करता केवळ बारामतीपुरता विचार करणारे महाराष्ट्राचे नेते कसे काय होऊ शकतात. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात पाच तालुक्‍यातील बळीराजा दंड थोपटल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांचा संतोप लक्षात घेऊन सरकारला आपली भूमिका बदलावीच लागेल.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com