ram satpute bjym vice prresident | Sarkarnama

"अभाविप'तून "भाजपा'त आवक वाढणार, सातपुते यांची "भाजयुमो'च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

उमेश घोंगडे
शुक्रवार, 1 जून 2018

पुणे : भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी प्रदेशमंत्री राम सातपुते यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत प्रदेश मंत्री म्हणून काम केल्यानंतर या माध्यमातून थेट भारतीय जनता युवा मोर्चाच्या कामात सहभागी होण्याची संधी सातपुते यांना मिळाली आहे. ही जबाबदारी मिळाल्याने "अभाविप'तून " भाजपा'त आलेल्या चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, अशिष शेलार यांच्या रांगेत सातपुते बसले आहेत. 

"अभाविप'तून "भाजपा'च्या माध्यमातून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आलेली राजेश पांडे, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार नरेंद्र पवार ही आणखी काही नावे आहेत. हे सर्वजण त्या-त्यावेळच्या राजकीय परिस्थितीत विशिष्ट भूमिका घेऊन "भाजपा'त आलेले आहेत. कालांतराने या साऱ्यांना "भाजपा'त चांगली संधी मिळाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आगामी निवडणुका समारे ठेऊन "भाजपा'शी संबंधित संस्था, संघटनांमधून उत्कृष्ठ क्षमता असलेल्या युवकांना पक्षातील विविध आघाड्यांमध्ये संधी देण्याचे धोरण पक्षाने स्वीाकरले आहे. सातपुते यांच्याकडे देण्यात आलेली जबाबदारी याचा नियोजनाचा भाग आहे. "अभाविप'मधील सातपुते यांच्या कारकिर्दीची दखल घेत त्यांना संधी देण्यात आल्याचे भारतीय जनता युवा मोर्चातील सूत्रांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्‍यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या सातपुते यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमात पदवी मिळविली आहे. "अभाविप'मध्ये त्यांनी केलेली आंदोलने, आक्रमक भाषणे विशेष गाजली आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख