Ram Mandir Verdict based on Proofs Say Supreme Court | Sarkarnama

राममंदीराबाबतचा निवाडा पुराव्यांच्याच आधारे : सर्वोच्च न्यायालय

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

राममंदीराबाबत घटनापीठाने आज जो निर्णय दिला आहे तो श्रद्धेच्या आधारे नसून उपलब्ध पुराव्यांच्या आधारेच दिला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागा राममंदीर न्यासाकडे सोपविण्याचा ऐतिहासिक निर्णय देतानाच न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत पाच एकर पर्यायी जागा देण्याचाही आदेश दिला आहे. 

नवी दिल्ली : राममंदीराबाबत घटनापीठाने आज जो निर्णय दिला आहे तो श्रद्धेच्या आधारे नसून उपलब्ध पुराव्यांच्या आधारेच दिला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागा राममंदीर न्यासाकडे सोपविण्याचा ऐतिहासिक निर्णय देतानाच न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत पाच एकर पर्यायी जागा देण्याचाही आदेश दिला आहे. 

सरन्यायाधीश रंजन गगोई यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने रामजन्मभूमीच्या वादावर तोडगा काढत बाबरी मशीदिची जागा रामजन्मभूमी न्यासला देण्याचा निर्णय दिला. हा निकाल देताना सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि शिया वक्फ बोर्ड यांच्या याचिका फेटाळल्या आहेत. अयोध्येत जी वास्तू पाडली गेली त्या ढाच्याखाली मंदिर होते, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख