'वाचाळवीर' कदमांना तिकीट पण तावडे - महेता वेटिंगवर !

Kadam-Mehata-Tawde
Kadam-Mehata-Tawde

मुंबई: मुंबईतील भाजपचे गड असलेले घाटकोपर पुर्व,बोरीवली,कुलाबा या गडांमधील सुभेदारांनाच वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.तर,घाटकोपर पश्‍चिम मधून 'इलेक्‍टीव मेरिट'च्या नावावर वाचाळवीर राम कदम यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

'तुमच्या आई वडीलांना पसंत असेल तर मुलगी उचलून आणू 'असे वादग्रस्त विधान करणारे राम कदम यांचे या निवडणुकीत तिकीट कापले जाईल अशी शक्‍यता व्यक्त केली जात होती.तसेच, स्थानिक पातळीवर त्यांनी भाजपपेक्षा स्वत:चेच नाव मोठे केले आहे.त्यामुळे त्यांना तिकीट मिळणार नाही हे निश्‍चितच होते. 

मात्र,कदम यांना तिकीट मिळाले नसते ते अपक्ष म्हणून उभे राहिले असते.त्यांचा पराभव करणे शक्‍य नसल्याने 'इलेक्‍टीव्ह मेरिट'च्या नावाखाली त्यांना पहिल्या यादीतच स्थान दिले.या उलट भाजपचा मुंबईचा तीन दशकांपासून गड असलेला घाटकोपर पुर्व मधील माजीमंत्री प्रकाश महेता यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.

त्यांच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील चटई क्षेत्र निर्देशकांच्या घोटाळ्याचा आरोप आहे.तसेच,हा भाजपसाठी सुरक्षीत मतदार संघ असून तेथे भाजपचा कोणताही गुजराती मतदार निवडून येऊ शकतो.त्यामुळे महेता यांच्या उमेदवारीवर साशंकता आहे.

उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.बोरीवली मधून ते निवडून आले होते.चार दशकांहून अधिक बोरीवलीतून भाजपचा उमेदवार निवडून येत आहे.जनता पक्षाच्या काळापासून हा मतदार संघ भाजपने सोडलेला नाही. तरीही येथून तावडे यांना उमेदवारी दिलेली नाही. तावडे यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाही नाराज आहेत .त्यांनीच त्यांचे नाव कापले असल्याचे समजते.

मात्र,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या नावासाठी आग्रही आहेत.शिक्षणमंत्री आशिष शेलार आणि तावडे यांच्यात कोकणातील मराठा असा समान दुवा आहे.त्यामुळे शेलार यांना शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना तावडे हवे आहेत. त्यामुळे दुसऱ्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश होऊ शकतो.

कुलाबा हा भाजपचा गड नसला तरी तेथे सध्या विरोधकच उरलेला नाही.त्यामुळे 'कमळ'चिन्हाचा विजय निश्‍चित मानला जात आहे.मात्र,विद्यमान आमदार राज पुरोहित यांना अद्याप वेटिंगवर ठेवले आहे.त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता कमी आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com