बायका बांगड्या भरतील म्हणून राम कदमांकहून दहिहंडी रद्द, मनसेने केले लक्ष्य 

ram kadam dahihandi festiwal cancel mns attack
ram kadam dahihandi festiwal cancel mns attack

मुंबई : दरवर्षी दहिहंडी मोठ्या उत्साहात आणि सिनेतारकांच्या उपस्थित साजरी करणारे भाजपचे आमदार राम कदम यांनी यंदा मोठी हंडी रद्द करून साधी आणि लहान हंडी लहान मुलांच्या हस्ते फोडली. यावर मनसेचे कदम यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले असून लबाड लांडगा डॉंग करतोय अशा आशयाचे पोस्टर्स झळकविले आहेत. 

दहिहंडीसाठी यावेळीही सलमान, शाहरुख आदी मंडळी येणार होती. मात्र पुरग्रस्तांसाठी ही हंडी रद्द केल्याचे कदम यांनी म्हटले आहे.मनसेचे केलेल्या टीकेवर ते म्हणाले, की मनसे पोस्टरवर टीका करण्यापुरतेच उरले आहेत. 

मनसेचे विधान अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी कदम यांच्याविरोध एक पोस्टर प्रसिद्ध केले असून ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.चुक्कल यांनी म्हटले आहे, की लबाड लांडगा ढोंग करतेय, बायका बांगड्या भरतील या भीतीने दहीहंडी रद्द करतंय ! 

दरम्यान, मागच्या दहीहंडीवेळी कदम यांनी मुलींना पळवण्याचे वादग्रस्त विधान करून संपूर्ण महाराष्ट्राचा रोष ओढवून घेतला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com