राम कदम यांच्याकडून यंदाचा दहीहंडी सोहळा रद्द

राम कदम यांच्याकडून यंदाचा दहीहंडी सोहळा रद्द

 पुणे : भाजपचे आमदार राम कदम यांनी कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी यंदाचा दहीहंडी सोहळा रद्द केला आहे. गेल्या वर्षी या सोहळ्यात वादग्रस्त वक्तव्यामुळे कदम अडचणीत आले होते. या सोहळ्याची सर्व रक्कम पूरग्रस्तांना देण्याचे कदम यांनी जाहीर केले.

इतर मंडळांनीही अशाच प्रकारे पूरग्रस्तांना सहकार्य करावे, असे आवाहन कदम यांनी केले आहे. घाटकोपर परिसरात कदम हे दर वर्षी दहीहंडी भरवितात. तेथे अनेक नेते, सेलिब्रिटी आवर्जून हजेरी लावत असतात.

मात्र गेल्या वर्षी एका वक्तव्यामुळे कदम हे चांगलेच वादात सापडले होते. त्यांच्यावर भाजपच्या प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारी असतानाही ते कॅमेऱ्यासमोर येण्याचे टाळत होते. पक्षानेच त्यांना तसे आदेश दिल्याचीही चर्चा होती.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही आपली ठाण्यातील दहीहंडी उत्सव गेल्या वर्षी भरविला नव्हता. आता कदम यांनीही यंदा माघार घेतली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com