ram kadam gujarati
ram kadam gujarati

राम कदमांचा गुजरातीत मतांचा जोगवा

अबु आझमी यांच्यासह काही आमदारांनी हिंदीत शपथ घेतली. अबु आझमी शपथ घेत असताना मनसेच्या काही आमदारांनी त्यांना धक्काबुक्की करत मारहाण केली होती. यात,राम कदम यांचाही समावेश होता.

मुंबई : हिंदीत शपथ घेतली म्हणून समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांना 2009 मध्ये मारहाण करणारे आमदार राम कदम यांनी निवडणुकीत मतांचा जोगावा मागण्यासाठी गुजरातीत बॅनर झळकवले आहेत. हे बॅनर परीसरात चांगलेच चर्चेचा विषय झाला आहे.

राम कदम हे घाटकोपर पश्‍चिम मतदार संघातून 2009 मध्ये मनसेतून आमदार म्हणून निवडून आले होते. राम कदम यांच्यासह मनसेसाठीही पहिली होती. या निवडणुकीनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधीमंडळात सर्व पक्षीय उमेदवारांनी मराठीत शपथ घ्यावी अशी भुमिका मांडली होती.

मात्र,अबु आझमी यांच्यासह काही आमदारांनी हिंदीत शपथ घेतली. अबु आझमी शपथ घेत असताना मनसेच्या काही आमदारांनी त्यांना धक्काबुक्की करत मारहाण केली होती. यात,राम कदम यांचाही समावेश होता. 

महाराष्ट्रात मराठीच अशी भुमिकाही त्यांनी मांडली होती. राम कदम यांनी 2014 मध्ये मनसे सोडून भाजप मध्ये प्रवेश घेऊन पुन्हा निवडून आले.या निवडणुकीतही ते घाटकोपर पश्‍चिम मतदार संघातून निवडणुक लढत असून त्यांनी या परीसरात गुजरातीत बॅनर लावले आहेत.

या बॅनवरची चर्चा संपुर्ण मतदार संघात तर रंगली आहे त्याच बरोबर समाजमाध्यमांवरही व्हायरल झाले आहे. शिवसेना नेता आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघात गुजराती सह अनेक अमराठी भाषेत होर्डिंग लावले होते. त्यावर नेटकऱ्यांनी ट्रॉल केल्यानंतर हे होर्डिंग हटविण्यात आले.

घाटकोपर पश्‍चिम मतदार संघात 51 टक्‍क्‍यांहून अधिक मराठी मतदार आहेत. तर,दहा ते बारा टक्के गुजराती मारवाडी जैन मतदार आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शुक्रवारी सभेत राम कदम यांचा समाचार घेताना आमच्या कडे होता तेव्हा राम होता आता रावण झाला अशी टिका केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com