Ram-Kadam-Birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : आमदार राम कदम

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 जानेवारी 2018

मनसेची पडझड सुरु असताना 2014 साली त्याच घाटकोपर मतदारसंघात कदम यांनी भाजपचे कमळ हाती घेऊन निवडणूक जिंकली.

राम कदम,  भाजप आमदार (मतदारसंघ : घाटकोपर पश्चिम, मुंबई) : राम कदम 2009 साली घाटकोपर पश्चिम मतदार संघातून मनसेच्या तिकिटावर निवडून गेले. मात्र सपाचे अबू आझमी यांना विधानसभेत धक्काबुक्की केल्याप्रकरणी राम कदम यांना 4 वर्षे निलंबित करण्यात आले होते. पक्षाची बाजू प्रखरपणे मांडणारे कदम हे  चर्चेतील चेहरा आहेत. मनसेची पडझड सुरु असताना 2014 साली त्याच घाटकोपर मतदारसंघात कदम यांनी भाजपचे कमळ हाती घेऊन निवडणूक जिंकली.
भाजपचे राष्ट्रीय नेते (कै.) प्रमोद महाजन यांच्या जवळची व्यक्ती म्हणून राजकीय वर्तुळात राम कदम यांची पूर्वीची ओळख आहे. त्यांनी राजकारणात राहूनही कीर्तनकार म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख