राम कदम -अवधूत वाघ यांना चंद्रकांतदादांनी प्रवक्ते पदावरून दिला  डच्चू

.
Ram_Kadam_
Ram_Kadam_

मुंबई:  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे घेतल्यावर भाजपची नूतन कार्यकारिणी अलिकडेच जाहीर केली आहे. ही कार्यकारिणी जाहीर करताना वाचाळवीर  प्रवक्‍त्यांना डच्चू दिला आहे. आमदार राम कदम आणि  अवधूत वाघ यांना प्रवक्‍तेपदावरून दूर केले आहे. 

ज्येष्ठ नेत्या कांताताई नलावडे यांनी स्वतःहून कळवल्यामुळे त्यांचीही चंद्रकांत पाटील यांनी प्रवक्‍ते पदाची जबाबदारी कमी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर कदम आणि वाघ यांना दूर केल्याचे समजते.

महाराष्ट्र नव निर्माण सेनेतून भाजपमध्ये प्रवेश करून आमदार झालेले राम कदम यांनी महिलांविषयी अनुचित उदगार काढल्यामुळे त्यांच्या विरोधात विरोधी पक्षाचा रोष आहे. त्यामुळे वर्तमान पत्रे, टीव्ही, चॅनेल आदी माध्यमावरील चर्चेत भाजपच्या वतीने भुमिका मांडताना कदम यांना पडते घ्यावे लागत आहे. विनाकारण आणखी वाद नको म्हणून कदम यांना डच्चू देण्यात आल्याचे समजते. 

तर कदम यांच्या प्रमाणेच अवधूत वाघ यांनी देखील वादग्रस्त विधाने केली आहेत. वाघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विष्णूचा अकरावा अतवार असे वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांना अनेकांच्या रोषास सामोरे जावे लागले होते. विधानसभा निवडणुकीत यांच्याकडून आणखी काही वादग्रस्त विधाने केली जाउ नयेत. याची खबरदारी घेताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रवक्‍तेपदावरून हटवले आहे.

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्तेपदी ना. माधव भांडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्ताने निवडणुकीच्या काळात भाजपतर्फे माधव भांडारी यांचा कुशल युक्तीवाद आणि विरोधकांना उपरोधिक टोले ऐकायला आणि पाहावयाला मिळणार आहे.  तर राज्यातील माध्यमांच्या संपर्क प्रमुखपदाच्या जबाबदारीसह केशव उपाध्ये यांची सहमुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  केशव उपाध्ये हे स्वतः पत्रकार राहिलेले आहेत . 

याशिवाय प्रवक्ते म्हणून  मधु चव्हाण, गिरीश व्यास, गणेश हाके, शिरिष बोराळकर, विश्वास पाठक, अतुल शाह, अर्चना डेहणकर, शिवराय कुलकर्णी, भालचंद्र शिरसाट, श्वेता शालिनी, इजाज देशमुख, सुनील नेरळकर यांची नावे आहेत . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com