राळेगणसिद्धी परिवाराचा आत्मदहनाचा इशारा

या वेळी हजारे यांच्या हत्येची सुपारी कोणी घेतली आहे, असा सवाल करत दोन दिवस वाट पाहू अन्यथा मंगळवारी संपूर्ण राळेगणसिद्धी परिवार आत्मदहन करील, असा इशारा राळेगण सिद्धीचे उपसरपंच लाभेष औटी यांनी दिला.या वेळी हजारे यांच्या हत्येची सुपारी कोणी घेतली आहे, असा सवाल करत दोन दिवस वाट पाहू अन्यथा मंगळवारी संपूर्ण राळेगणसिद्धी परिवार आत्मदहन करील, असा इशारा राळेगण सिद्धीचे उपसरपंच लाभेष औटी यांनी दिला.
राळेगणसिद्धी परिवाराचा आत्मदहनाचा इशारा

पारनेर : या वेळी हजारे यांच्या हत्येची सुपारी कोणी घेतली आहे, असा सवाल करत दोन दिवस वाट पाहू अन्यथा मंगळवारी संपूर्ण राळेगणसिद्धी परिवार आत्मदहन करील, असा इशारा राळेगण सिद्धीचे उपसरपंच लाभेष औटी यांनी दिला.

सुपे येथे नगर पुणे महामार्गावर अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. या वेळी सुमारे एक हजारावर लोक उपस्थित होते. या वेळी बोलताना विविध कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सुरेश पठारे म्हणाले, की उद्यापासून गनिमी काव्याने लढा देऊ हजारे यांचे काही बरे वाईट झाले, तर जबाबदारी सरकारची आहे. या मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत. निर्णय लवकर झाला नाही, तर सरकारच्या कोणत्याही पुढाऱ्यांना फिरकू देणार नाही.

शंकर नगरे यांनी सरकार दखल घेत नाही त्याबद्द्ल सरकारचा व तालुका जिल्हा लोकप्रतिनिधी यांचा निषेध केला. या वेळी सरपंच प्रभावती पठारे उपसरपंच लाभेष औटी, जयसिंग मापारी, राहुल खामकर, दत्त आवारी, दादा पठारे आदी उपस्थित होते. 'माझा गाव माझे सरकार' या नियमाप्रमाणे आम्ही मंगळवारपासून कोणत्याही अधिकारी व पुढाऱ्यांना गावात येऊ देणार नाहीत, असा इशारा लाभेष औटी यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com