रात्री साडेअकरापर्यंत भारतीताईंना पाठींबा देण्यासाठीच आम्ही थांबलो होतो: रक्षा खडसे

देशातील अनेक महत्वपूर्ण विषयावर आम्ही चर्चा करतो, त्याकडे लक्ष दिले जात नाही. आम्ही सहज हसलो म्हणून हा विषय गंभीरपणे घेण्याची गरज नाही.- खासदार रक्षा खडसे
Raksha_Khadse
Raksha_Khadse

जळगाव : देशातील अनेक महत्वपूर्ण विषयावर आम्ही चर्चा करतो, त्याकडे लक्ष दिले जात नाही. आम्ही सहज हसलो म्हणून हा विषय गंभीरपणे घेण्याची गरज नाही. मात्र 'राष्ट्रवादी कॉंग्रेस' त्याचे भांडवल करीत आहेत. खासदार भारतीताई पवार बोलल्या म्हणून आम्ही हसलो असे मुळीच नाही, उलट त्यांना पाठींबा देण्यासाठीच आम्ही थांबलो होतो. असे मत खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. 

लोकसभेत चर्चेच्या वेळी खासदार डॉ. भारती पवार मराठीतून भाषण करीत असतांना खासदार प्रितम मुंडे व खासदार रक्षा खडसे हसत असल्याचा व्हीडीयो मोबाईलवर व्हायरल होत आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना खासदार रक्षा खडसे म्हणाल्या कि, संसदेत महाराष्ट्राचे खासदार बोलत असल्यास त्यांना पाठींबा देण्यासाठी आम्ही थाबंतो, त्या दिवशी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत कामकाज सुरू होते. खासदार भारती पवार भाषण करीत असल्यामुळे त्यांना पाठींबा देण्यासाठी आम्ही थांबलो होतो. त्यांचे भाषण सुरू असतांना अगदी शेवटच्या क्षणी आम्ही सहजच हसलो, आणि संसदेत थोडेफार हसणे सुरूच असते.

 मात्र त्यावर  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लोकांनी कमेंट केल्या कि, मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीचा विषय भारती पवार बोलल्या म्हणून दोघी हसल्या, आणि ते व्हीडीओ व्हायरल केले. वास्तविक असा काहीही विषय नाही. वास्तविक हा विषय तेवढा गंभीर नव्हताच. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामाचा आणि देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामाचा आम्हाला अभिमानच आहे.

 त्यामुळे उगाच आमच्या हसण्याची विषयाची चर्चा करण्यात आली. आमची मिडीयाला विंनती आहे, कि चांगल्या कामाची प्रसिध्दी करावी,त्या मुंडेच्या कन्या आहेत, आणि मी खडसेंची सून आहे म्हणून त्यांनी हास्य केले असे म्हणणे म्हणण योग्य नाही. डॉ.भारती पवार या खासदार आहेत. त्याही नवीन खासदार आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com