आपण खूप पापं केली आहेत, त्यामुळे देवाच्या चरणी या!

या व्हिडीओमुळे राखी सावंतवर कायदेशीर कारवाईचा विचार होवू शकतो.
rakhi sawant shares video about corona virus
rakhi sawant shares video about corona virus

पुणे : वादग्रस्त विधाने करून सतत लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री राखी सावंत हिने ''आपण खूप पाप केली आहेत. पापामुळे करोना आला आहे" असा शोध लावत, "देवाच्या चरणी या, कोरोना होणार नाही" असे सांगणारा तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

“कोरोना व्हायरस जगभर पसरला आहे. सगळेजण तुम्हाला हात, पाय, तोंड, डोकं धुवायला सांगत आहेत. सगळं धुवा पण हा आत्मा कसा धुणार? आपण खूप पापं केली आहेत. जगात सगळ्यांनी पापं केली आहेत. तु्म्हाला काय वाटतं हा कोरोना व्हायरस कुठून आला आहे? कोरोना लोकांना धडा शिकवायला आला आहे. मी सांगते तुम्ही अजूनही देवाच्या चरणी या. आपल्या पापांची माफी मागा. माझी खात्री आहे तुम्हाला कोरोना व्हायरस कधीही होणार नाही.”असं राखी सावंत हिनं म्हटलं आहे.

कोरोनो रोखण्यासाठी देशभर शासकीय यंत्रणा गतिमान झाली आहे. कोरोनाला रोखण्याच्या प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु आहे. शासनस्तरावरून  लोकजागृती करण्यात येत आहे मात्र या जागृतीची खिल्ली राखीने आपल्या व्हिडिओत उडवली आहे." सगळेजण तुम्हाला सांगतायत हात धुवा, पाय धुवा.. डोक धुवा.. तोंड धुवा.. सगळं धुवा पण हा आत्मा कसा धुणार? "असा प्रश्न विचारत तिने," जगात पाप वाढले आहे म्हणून कोरोना आला आहे. "

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com