कसाबला मारण्याची सुपारी दावूद इब्राहिमकडे होती; राकेश मारिया यांचा दावा - Rakesh Maria Revels ISI Plot in his Autobiography | Politics Marathi News - Sarkarnama

कसाबला मारण्याची सुपारी दावूद इब्राहिमकडे होती; राकेश मारिया यांचा दावा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

जिवंत सापडलेल्या अजमल कसाबला मारण्याची सुपारी कुख्यात डॉन दावूद इब्राहिम याला देण्यात आली होती, असा दावा मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आत्मचरित्रात केला आहे

मुंबई : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेला हल्ला हिंदू दहशतवाद्यांनी घडवून आणल्याचा बनाव आयएसआयला रचायचा होता. तशी ओळखपत्रेही या दहशतवाद्यांकडे सापडली होती. जिवंत सापडलेल्या अजमल कसाबला मारण्याची सुपारी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याला देण्यात आली होती, असा दावा मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आत्मचरित्रात केला आहे.

पोलिसांना कसाबचे छायाचित्र प्रसिद्ध करायचे नव्हते. दहशतवाद्यांची माहिती प्रसारमाध्यमांना मिळू नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. जगभरात नाचक्की होऊ नये म्हणून आयएसआय आणि लष्कर-ए-तय्यबाने कसाबला मारण्याची सुपारी दावूदला दिली होती, असा दावा मारिया यांनी या पुस्तकात केला आहे. 

संबंधित लेख