तुमच्या दहा पिढ्यांना आरक्षणाची गरज नाही, पण गोर-गरीब मराठ्यांसाठी तर बाहेर पडा.. - Your ten generations do not need reservation, but for the very poor Marathas, go out | Politics Marathi News - Sarkarnama

तुमच्या दहा पिढ्यांना आरक्षणाची गरज नाही, पण गोर-गरीब मराठ्यांसाठी तर बाहेर पडा..

संतोष जोशी
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

काॅंग्रेस- राष्ट्रवादीसह मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टिका केली. काँग्रेस - राष्ट्रवादी पक्षात सर्वाधिक मराठा आमदार आहेत. पण या दोन पक्षांनीच मराठ्यांचे सर्वाधिक शोषण केल्याचा आरोप  पाटील यांनी केला. याचा एवढा संताप येतोयं की, जर तलवारी बाळगण्याची परवानगी असती, तर एक- दोन जणांचा त्याच तलवारीने घात केला असता, असे खळबळजनक विधानही पाटील यांनी केले.

नांदेड ः तुमच्या दहा पिढ्यांना आरक्षणाची गरज नाही, पण गोरगरीब मराठ्यांसाठी तरी बाहेर पडा, जर तेवढंही जमत नसेल तर तुमचे नाव बदलून टाका, अशी खोचक टिका अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली. तुमचं आदर्शही आम्हाला माहित आहे, आणि तुमचं सुदर्शनही आम्हाला माहित आहे, असा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यात सरकारच्या विरोधातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य सरकार हे आरक्षण टिकवण्यात आणि न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडले, असा ठपका मराठा आरक्षणासाठी न्यायलयात लढा देणाऱ्या संघटना आणि याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यानंतर राज्यभरात पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणि रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला होता.

मराठा आरक्षणासाठी राज्यात विविध ठिकाणी एल्गार परिषदेचे आयोजन देखील करण्यात आले होते. आज याच परिषदे अंतर्गत नांदेड येथे बोलतांना नरेंद्र पाटील यांनी काॅंग्रेस- राष्ट्रवादीसह मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टिका केली. काँग्रेस - राष्ट्रवादी पक्षात सर्वाधिक मराठा आमदार आहेत. पण या दोन पक्षांनीच मराठ्यांचे सर्वाधिक शोषण केल्याचा आरोप  पाटील यांनी केला. याचा एवढा संताप येतोयं की, जर तलवारी बाळगण्याची परवानगी असती, तर एक- दोन जणांचा त्याच तलवारीने घात केला असता, असे खळबळजनक विधानही पाटील यांनी केले.

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर हल्ला चढवतांना पाटील म्हणाले, तुमचं आदर्शही माहीत आहे आणि सुदर्शनही माहित आहे. तुमच्या दहा पिढ्यांना आरक्षणाची गरज नाही, पण गोर-गरीब मराठ्यांसाठीही तुम्ही बाहेर पडू शकत नसाल, तर तुमचं नाव बदलू टाका.

आरक्षणासाठी समाजातील तज्ञांची समिती नेमा..

माझा लढा हा केवळ मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नाही, तर बहुजन समाजासह अठरापगड जाती, बारा बलुतेदारांसाठी देखील आहे. सगळ्यांनी एकजुटीने एका छता खाली येऊन आपल्या न्याय हक्काचा लढा द्यावा, यासाठी आपण लढत आहोत, अशा ग्वाही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. नांदेड येथे आयोजित मराठा एल्गार परिषदेत ते बोलत होते.

संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका मांडली. हा लढा केवळ मराठ समाजासाठीचा नाही, तर बहुजन आणि अठरापगड जाती, बारा बलुतेदारांसाठी आहे. सगळ्यांनी एकत्रितपणे लढा दिला तरच आपल्याला न्याय मिळू शकेल. मराठा आरक्षण मिळवायचं असेल तर अशोक चव्हाणांनी आता समाजातील तज्ञ मंडळीची समिती स्थापन करायला हवी. या तज्ञ मंडळींशी चर्चा आणि त्यांचे मत विचारात घेऊनच सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडावी, असा सल्ला संभाजीराजे यांनी चव्हाणांना दिला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख