काका पवार, चंद्रहार पाटील - कुणाला मिळणार विधानपरिषदेची संधी?

काका पवार यांनी पुण्यात आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल उभा केले आहे. ते अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी आहेत. त्यांनी देशपातळीवरची अनेक पदके मिळवून कुस्ती क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.चंद्रहार पाटील यांच्या समर्थकांनी तर'चंद्रहार पाटील यांना या महिन्यात त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विधानपरिषदेवर संधी मिळणार'असा विश्वास व्यक्त केला आहे.
Chandrahar Patil and Kaka Pawar Want Council Post
Chandrahar Patil and Kaka Pawar Want Council Post

पुणे : विधानपरिषदेच्या निवडणुकीची अद्याप कसलीही अधिसूचना निघालेली नाही. या जागेवर आपली वर्णी लागावी म्हणून इच्छुक प्रयत्न करताना दिसत आहेत.अर्जुन पुरस्कार विजेते पैलवान काका पवार आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील या दोन पैलवानांनी आमदारकी मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी केली आहे. त्यांच्या मागणीमुळे कुस्ती क्षेत्रात चैतन्य निर्माण झाले आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या समर्थकांनी तर " ''चंद्रहार पाटील यांना या महिन्यात त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विधानपरिषदेवर संधी मिळणार, असा विश्वास सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. 

दोन महिन्यांपूर्वी १९७८ चे महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम यांनी 'विधानपरिषदेवर कुस्तीगिराला संधी द्यावी.'अशी मागणी केली होती. त्यांनी एका पैलवानाला संधी मिळावी असे म्हटले होते. गेल्या दोन आठवड्यात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेऊन'विधानपरिषदेवर संधी द्यावी,' अशी मागणी केली होती. चंद्रहार पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती.तेव्हा त्यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते रामराव दादा पाटील यांचा पराभव केला होता. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळीशी चांगले संबध आहेत.

काका पवार यांनी पुण्यात आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल उभा केले आहे. ते अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी आहेत. त्यांनी देशपातळीवरची अनेक पदके मिळवून कुस्ती क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे  आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या माध्यमातून त्यांनी अनेक मल्ल घडवले आहेत. त्यांनी रोहा येथे जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन 'विधानपरिषदेवर संधी द्या'अशी मागणी केली आहे.

कुस्ती क्षेत्रातील दोन ताकदीच्या मल्लानी विधानपरिषदेची मागणी केल्याने याखेपेस कुस्ती क्षेत्राचा विचार होईल अशी अपेक्षा कुस्ती शौकीन करताना दिसत आहेत. चंद्रहार पाटील यांच्या समर्थकांनी तर'चंद्रहार पाटील यांना या महिन्यात त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विधानपरिषदेवर संधी मिळणार'असा विश्वास व्यक्त केला आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com