महिलेच्या व्हॉट्सअॅप स्टेट्सवरून पेटला वाद, निवडणुक निकालाआधीच दोन गटांत राडा

स्टेट्सवरील माहितीवरून सुरूवातीला दोन गटांत वाद झाल्यानंतर त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. याप्रकरणी दोन्ही गटातील 22 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Womens Watsapp status create contraversy in Dhule district
Womens Watsapp status create contraversy in Dhule district

धुळे : एका महिलेच्या व्हाॅट्सअॅप स्टेट्सरून धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील लंगाने गावात दोन गटांत तुफान हाणामारी झाली आहे. स्टेट्सवरील माहितीवरून सुरूवातीला दोन गटांत वाद झाल्यानंतर त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. याप्रकरणी दोन्ही गटातील 22 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर विरोधी गटांमध्ये वाद होण्याचे प्रकार अनेकदा घडतात. पण निकाल लागण्याआधीच शुल्लक कारणांवरून वाद होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. धुळ्यासह भिवंडी, यवतमाळ आदी ठिकाणी वाद व हाणामारीचे प्रकार घडले आहेत. सोमवारी निवडणुकीचे निकाल असल्याने उत्सुकता चांगलीच ताणली गेली आहे. शुल्लक कारणांवरून एकमेकांच्या भावना दुखावल्या जात असल्याने वाद होत आहेत.

लंगाने गावातील एका महिलेने तिच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरील माहितीवरुन सुरूवातीला दोन गटांत वाद झाला. काही वेळाने या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये दोघे जण जखमीही झाले आहेत. या हाणामारीनंतर दोंडाईचा पोलिस ठाण्यात 22 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. 

गावामध्ये सकाळपासूनच तणावपूर्ण शांतता असून पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त या गावामध्ये तैनात करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी येथील ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान पार पडले. सोमवारी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होण्याआधीच  राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निकालानंतर गावात आणखी वाद होऊ नयेत, याची दक्षता पोलिसांना घ्यावी लागणार आहे. 

दरम्यान, राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत सरासरी 80 टक्के मतदान झाले आहे. ग्रामपंचायतींच्या 1 लाख 25 हजार 709 जागांसाठी एकूण 3 लाख 56 हजार 221 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननी आणि माघारीनंतर 2 लाख 41 हजार 598 उमेदवार शिल्लक होते. त्यापैकी 26 हजार 718 उमेदवार बिनिविरोध विजयी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अंतिमत: 2 लाख 14 हजार 880 उमेदवार आज प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आहेत. सोमवारी मतमोजणी होणार असल्याने उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com