खासदार रणजितसिंह निंबाळकरांना केंद्रीय मंत्रीमंडळात संधी मिळणार?

संपूर्ण माढा लोकसभा मतदार संघातून जाणाऱ्या मुंबई - हैद्राबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे. सध्या त्याचे हवाई सर्वेक्षण सुरू आहे.
Will MP Ranjitsinh Nimbalkar get a chance in the Union Cabinet?
Will MP Ranjitsinh Nimbalkar get a chance in the Union Cabinet?

फलटण शहर : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण - लोणंद व त्यानंतर फलटण - पुणे ही फलटणकरांच्या स्वप्नातील रेल्वे प्रत्यक्षात उतरवली. रेल्वे, पाणी, रस्ते, रोजगार निर्मिती अशा विविध कामांच्या पूर्ततेसाठी त्यांनी दोन वर्षात माढा लोकसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात त्यांचा समावेश व्हावा, अशी आग्रही मागणी खासदार समर्थकांमधून होऊ लागली आहे. Will MP Ranjitsinh Nimbalkar get a chance in the Union Cabinet?

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रथम फलटण - लोणंद रेल्वे सुरु केली. नीरा-देवघरचे बारामतीला वळविलेले पाणी बंद करुन ते पुन्हा नीरा उजव्या कालव्यात वळवले. आमदार जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून आलेला माण तालुक्यातील 54 गावांना वरदान ठरणाऱ्या जिहे कठापूर प्रकल्पासाठी निधी मिळवण्यात आमदार जयकुमार गोरे यांच्या साथीने यश मिळवले.

निरा - भिमा स्थिरीकरणाचा महत्त्वांकांक्षी प्रकल्पाची सुरुवात होण्यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर हे विशेष परिश्रम घेत आहेत. नुकतीच फलटण - पुणे रेल्वे सेवा सुरु झाली असून फलटण - पंढरपूर रेल्वेसाठी त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर या रेल्वेमार्गचे सध्या सर्वेक्षण सुरु आहे. संपूर्ण माढा लोकसभा मतदार संघातून जाणाऱ्या मुंबई - हैद्राबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे. सध्या त्याचे हवाई सर्वेक्षण सुरू आहे.

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात कुर्डूवाडी रेल्वे कारखान्यासाठी 32.68 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करून घेतला आहे. मोडनिंब येथे रेल्वे शेड उभारणी, तसेच मोडनिंब येथे चेन्नई एक्सप्रेसचा थांबा रणजितसिंह यांच्या पाठपुराव्यातून झाला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले. केंद्र सरकारच्या केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी योजनेतून सातारा व सोलापूर जिल्ह्यातील विविध रस्त्यांना भरीव निधीची तरतूद केली.

यामध्ये बचेरी - शिंगोर्णी - कटफळ - अचकदाणी रस्त्यासाठी 3 कोटी 45 लाख, फलटण - मांडवखडक - कुरोली, सोनलवाडी-येलमारमांगेवाडी- वाटंबरे - हनुतगाव - सोनंद - घेरडी रस्ता दुरुस्तीसाठी भरीव निधी उपलब्ध केला. दालवडी - उपळवे - वेळोशी- कुळकजाई, रोड (सीतामाई घाट) रस्त्यासाठी 592.65 कोटी, नातेपुते - लोणंद - गिरवी - इस्लामपूर रस्त्यासाठी 9 कोटी 2 लाख. गरवाड-निमगाव ते वेळापूर रस्ता दुरुस्तीसाठी 9 कोटी 79 लाख. टेंभूर्णी येथील शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय राज्यमार्गासाठी रू. 49.72 कोटी, इंदापूर ते तोंडले मधील 46 किमी चौपदरी मार्गासाठी रू. 1601 कोटी टेंभूर्णी ते कुळसंब 73 किमी मार्गासाठी रु. 157.72 कोटी, धर्मपुरी ते लोणंद (संत ज्ञानेश्वर पालखीमार्ग) मधील 49.40 किमी साठी 1412 कोटी आळंदी- पंढरपूर- मोहोळ असा राष्ट्रीय महामार्ग 965 हा 250 किमीचा महामार्ग मंजूर केला आहे. 

माढा लोकसभा मतदारसंघाचे या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केले होते. पवारांच्या मतदार संघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपचा झेंडा फडकविल्याने हा मतदारसंघ देशभरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला होता. रणजितसिंह यांचा दुध व साखर उद्योगांबाबतचा विशेष अभ्यास आहे. जनतेच्या हितासाठी त्यांनी वेळोवेळी संघर्षाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांचे पक्षिय योगदान व कार्य लक्षात घेवून त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश करावा, अशी आग्रही मागणी होत आहे.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com