उजनीचे पाणी राखण्यासाठी सोलापूरच्या नेत्यांनी जयंत पाटलांना कसं पटवलं?

उजनीचे पाणी इंदापूरला देण्याच्या निर्णयाचा राष्ट्रवादीला धोका जयंत पाटलांना समजावून सांगण्यात आला.
Jayant Patil-Ajit Pawar
Jayant Patil-Ajit Pawar

पुणे : सांडपाण्याच्या नावाखाली सोलापूरच्या हक्काचे पाच टीएमसी पाणी इंदापूरला वळविण्याचा निर्णय सोलापूरकरांच्या रोषामुळे राज्य सरकारला बुधवारी रद्द करावा लागला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रद्दच्या निर्णयाची घोषणा मुंबईत केली. मात्र. पाटील यांना हा निर्णय घेण्यास भाग पाडण्यात सर्वाधिक वाटा राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांचा होता. यात सर्वाधिक प्रयत्न केले ते करमाळ्याचे आमदार संजय शिंदे व पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी. (MLA Sanjay Shinde and Umesh Patil tried hard to convince Jayant Patil)

पाच टीएमसी पाणी इंदापूरला वळविण्याचा निर्णय चार दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. उजनीतील सांडपाणी वळविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मात्र, सांडपाणी आणि इतर पाणी असे वेगळे करता येत नाही. निर्णय घेताना सांडपाण्याच्या नावाखाली सोलापूरकरांच्या डोळ्यात धूळफेक करण्यात आली होती. सोलापूरचे पाणी पळविण्याचा डाव लक्षात आल्यानंतर जिल्ह्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अजित पवार यांच्याविरोधात असंतोष पसरला. भारतीय जनता पार्टीने या विषयात आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेसला लक्ष्य केले.

या साऱ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते एकवटले. साऱ्यांनी मुंबई गाठली व जलपसंपदा मंत्री जयंत पाटील यांना वस्तुस्थिती सांगितली. उजनीचे पाणी पळविण्याचे राजकीय परिणाम काय होतील. जिल्ह्यात पक्षाची काय स्थिती होईल. या साऱ्यांची कल्पना पाटील यांना देण्यात आली. पाटील यांनी जलसंपदा विभागातील प्रमुख आधिकाऱ्यांशी चर्चा केली. शेवटी सारासार विचार करून उजनीतील पाणी वळविण्याचा निर्णय रद्द करण्यात आला.


 

या संदर्भात ‘सरकारनामा’शी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले, ‘‘ निर्णय घेताना आधिकाऱ्यांनी केलेल्या चुकांमुळे गोंधळ झाला. साऱ्या बाबी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या लक्षात आणून देण्यात आल्या. त्यासाठी आमदार बबन शिंदे, संजय शिंदे, यशवंत माने, माजी आमदार दीपक साळंके, कल्याण काळे यांच्यासह मी स्वत: जलसंपदा मंत्री पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर पाटील यांनी जलसंपदा विभागातील आधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पाटील यांनी पाणी वळविण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. उजनी धरणाच्या १२१ टीएमसी पाण्याचे आधीच वाटप झाले आहे. त्यामुळे त्यात पुन्हा इतर कुणाला पाणी देण्याचा प्रश्‍न येत नाही. सोलापूरच्या वाट्याचे पाणी इतर कुणाला देण्याचा प्रश्‍नच येत नसल्याचे पाटील यांनीही आमच्यासोबत बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे विरोधकांनीही या विषयात आता राजकारण करून सोलापूरकरांची फसवणूक करू नये

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com