`अंगार, भंगार`, या काय घोषणा आहेत का? ही आपली संस्कृती नाही; घोषणाबाजी करणाऱ्या समर्थकांना पंकजांनी सुनावले..

परळीत दाखल झाल्याबरोबर कराड यांना मुंडे समर्थकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. पंकजा मुंडे यांच्या निवासस्थाना बाहेरच समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Bjp Leader Pankaja Munde- Dr.Karad News Parli
Bjp Leader Pankaja Munde- Dr.Karad News Parli

परळी वैजनाथ: केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या जन आशिर्वाद यात्रेला गोपीनाथ गडावरून प्रारंभ झाला. पण परळी प्रमाणेच गोपीनाथ गडावर देखील पंकजा मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पंकजा मुंडे अंगार है बाकी सब भंगार है, या घोषणा सुरू झाल्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांवर चांगल्याच संतापल्या. (What are the announcements of 'Angar, Bhangar'? This is not our culture; Pankaj told the supporters who were shouting slogans.) या काय घोषणा आहेत का? हा भाजपचाच कार्यक्रम आहे, अशा घोषणांनी आपली बदनामी होते, हे आपले संस्कार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी घोषणा देणाऱ्या समर्थकांना सुनावले.

तुम्ही अशाच घोषणा देत राहिलात तर मी तुमच्याशी बोलणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (Bjp Leader Pankaja Munde) भाजपच्या नवनिर्वाचित मंत्र्यांच्या वतीने आपापल्या भागातील पाच लोकसभा मतदारसंघात जन आशिर्वाद काढण्याचे  आदेश दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. (Central State Minister Dr.Bhagwat Karad) त्यानूसार केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी मराठवाड्यातील आपल्या यात्रेचा शुभारंभ गोपीनाथ गडावरून करण्याचे जाहीर केले होते.

पंकजा व प्रीतम या मुंडे भगिनींना डावलून डाॅ.कराड यांना मंत्री करण्यात आल्याचा राग मुंडे समर्थकांमध्ये आहे. अशावेळी कराडांची यात्रा परळीतूनच सुरू होणार असल्यामुळे समर्थकांचा संताप व्यक्त होणार हे अपेक्षित होते. परळीत दाखल झाल्याबरोबर कराड यांना मुंडे समर्थकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. पंकजा मुंडे यांच्या निवासस्थाना बाहेरच समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनतर जेव्हा गोपीनाथ गडावरून प्रत्यक्षात जन आशिर्वाद यात्रेला सुरूवात झाली, तेव्हा तर मुंडे समर्थकांच्या घोषणाबाजीला अधिकच धार आल्याचे पहायला मिळाले.

अशा घोषणांनी बदनामी होते..

`पंकजा मुंडे अंगार है बाकी सब भंगार है`, अशा घोषणा देण्यात आल्या.  या घोषणा ऐकून पंकजा मुंडे चांगल्याच संतापल्या. पंकजा मुंडे यांनी जाग्यावरच थेट कार्यकर्त्यांना झापले.  पंकजा मुंडे यांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना `तुम्ही इथे अशा घोषणा देवू नका, हा दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम नाही, आपल्याच पक्षाचा कार्यक्रम आहे, अशा घोषणांनी बदनामी होते. चुकीच्या घोषणा देणाऱ्यांना मी बोलणार नाही, भेटणार नाही, चांगल्या घोषणा द्या, अंगार भंगार या काय घोषणा देताय.  हे संस्कार आहेत का आपले? अशा शब्दांत त्यांनी समर्थकांची कानउघाडणी केली.

जनआशीर्वाद यात्रेला भाजपचा झेंडा दाखवून पंकजा मुंडे यांनी  शुभारंभ केला. यावेळी खासदार प्रीतम मुंडे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, नमिता मुंदडा,  सुरेश धस, लक्ष्मण पवार, रमेश कराड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, नितीन काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com