नवसंजीवनी देणारी लढाई जिंकायचीच आहे - उदयनराजे भोसले

आपल्या महाराष्ट्रासाठी नवसंजीवनी देणारी लढाई आहे ती जिंकायचीच आहे, असे आवाहन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
 we will fight against corona for new life says chhatrapati udayanraje bhonsle
we will fight against corona for new life says chhatrapati udayanraje bhonsle

पुणे :  देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून लॉकडाऊन 17 मेपर्यंत असेल. संपूर्ण देशात महाराष्ट्रात रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रासाठी नवसंजीवनी देणारी लढाई आहे ती जिंकायचीच आहे, असे आवाहन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे. 

केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्याची काही तासांपूर्वीच घोषणा केली. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विट करीत `ही संजीवनी देणारी लढाई जिंकायची आहे' असे आवाहन महाराष्ट्रवासियांना केले आहे.

सोमवारपासून तिसरा लॉकडाऊन 
केंद्र सरकारने लागू केलेल्या दुसऱ्या लॉकडाऊनची मुदत तीन मे रोजी संपत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी दोन आठवडे वाढविला असून, त्याची अंमलबजावणी चार मेपासून होणार आहे.

प्रत्येक लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी देशाला संबोधित केले होते. तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा मोदींनी न करता एका नोटिफिकेशऩद्वारे करण्यात आली. येत्या 17 मेपर्यंत हा लॉकडाऊन लागू राहणार आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी काही सवलतींची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठीच्या बैठका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. त्यानुसार मजुरांची ने-आण करण्यासाठी खास रेल्वेची व्यवस्था करण्याचे ठरले आहे.

ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील जिल्ह्यासाठी स्वतंत्र सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ग्रीन झोन म्हणजे जिथे कोरोनाची एकही रुग्ण गेल्या 21 दिवसांत सापडलेला नाही. रेड झोन- एकूण रुग्णांची संख्या, वाढीचा वेग, टेस्टिंगचे प्रमाण यावर ठरविण्यात येणार आहे. जे जिल्हे ग्रीन किंवा रेड झोन नसतील ते ऑरेंजमध्ये गृहीत धरले जातील.

हे झोन दर आठवड्याला निश्चित केले जातील. राज्यांना रेड किंवा ऑरेंज झोनमध्ये जिल्हे समाविष्ट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांची तीव्रता कमी करण्याचा अधिकार राज्यांना नाही. गेल्या चोवीस तासांत देशांतील कोरोना रुग्णांचा आकडा 35 हजारांहून अधिक झाला आहे. राज्यातील एकूण 14 जिल्हे तर देशातील 120 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. 

महाराष्ट्रातील रेड झोन जिल्हे-मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com