जयंत पाटील म्हणतात, राज्यात 3 हजार 276 ग्रामपंचायती जिंकून आम्हीच नंबर वन

महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजपला राज्यात 20 टक्केही ग्रामपंचायतीमिळाल्या नाहीत.
we are number one in the state by winning 3 thousand 276 gram panchayats says Jayant Patil
we are number one in the state by winning 3 thousand 276 gram panchayats says Jayant Patil

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून विजयाबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. भाजपकडून आपणच नंबर वन असल्याचा दावा सातत्याने केला जात आहे. तर आता राज्यात 3 हजार 276 ग्रामपंचायती मिळवून आपणच नंबर एकचा पक्ष ठरल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. तर महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजपला राज्यात 20 टक्केही ग्रामपंचायती मिळाल्या नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होण्यापुर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेत्यांनी विजयी जल्लोष सुरू केला होता. राज्यात सहा हजारांहून जागा जिंकल्याचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जाहीर केले होते. तर मंगळवारी पक्षाकडून 5 हजार 781 हा आकडा सांगत भाजपच नंबर एकचा पक्ष असल्याचे सांगितले. हा दावा जयंत पाटील यांनी खोडून काढला आहे.

पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी राष्ट्रवादीला राज्यात 13 हजार 295 पैकी 3 हजार 276 ग्रामंपचायती मिळाल्याचे सांगितले. तर 1 हजार 938 ग्रामपंचायती मिळवून काँग्रेस चौथ्या स्थानी असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत. शिवसेनेला  2 हजार 406 तर भाजपला 2 हजार 942 ग्रामपंचायती मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.

महाविकास आघाडीने एकत्रितपणे चांगले यश मिळविले आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढविली. त्यातुलनेत भाजपला 20 टक्केही जागा मिळालेल्या नाहीत. भाजपचे अस्तित्व मर्यादित स्वरूपात दिसत असल्याचे त्यांनी नमुद केले.

स्टेअरिंग मुख्यमंत्र्यांच्या हातात...

सरकारचे स्टेअरिंग मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याच हातात आहे. अनेक अडथळे आले असले तरी त्यांची गाडी व्यवस्थित सुरू असल्याचे पाटील यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले. 

निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करावी

देशाच्या संरक्षणच्या दृष्टीने महत्वाची माहिती बाहेर येणे, ही गंभीर बाब आहे. अर्णब गोस्वामी यांना वाचविण्याचा प्रयत्न भाजप का करत आहे? पुढील काळात घडणाऱ्या घटनांची माहिती त्यांना आधीच असल्याचे टीआरपी प्रकरणात दोघांमधील उघड झालेला संवादातून बाहेर आले आहे.

त्यामुळे या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. याकडे केंद्राने कोणत्याही पक्षीय दृष्टीने न पाहता निरपेक्षपणे संरक्षण माहितीबाबत पारदर्शकता समोर आणली पाहिजे, असेही ते म्हणाले.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com