वंजारी, लोंढे, देशमुख, सिंगलकर प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीत..  

राज्यात काँग्रेसला अजूनही मोठा जनाधार असून, त्याच्या बळावरच पक्ष पहिल्या क्रमांकावर नेण्याचे स्वप्न पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाहिले आहे.
वंजारी, लोंढे, देशमुख, सिंगलकर प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीत..  
Abhijeet Wanjari - londhe - deshmukh

नागपूर : काँग्रेस पक्षाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून आमदार ॲड. अभिजित वंजारी, अतुल लोंढे, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख, Abhijeet wanjari, Former MLA Ashish Deshmukh, Atul Londhe मुन्ना ओझा यांच्यासह, अनंतराव घारड, किशोर गजभिये, उमाकांत अग्निहोत्री, नंदा पराते, हैदरअली दोसानी, अक्षय समर्थ, संदेश सिंगलकर, विजय बारसे, संजय महाकाळकर यांना यात स्थान देण्यात आले आहे. 

अभिजित वंजारी हे नागपूर विभागीय पदवीधर संघातून अलीकडेच निवडून आले आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मतदारसंघात भाजप उमेदवाराचा ऐतिहासिक पराभव केला आहे. त्यामुळे त्यांना महासचिव करून पदोन्नती देण्यात आली आहे. महासचिवांमध्ये माजी आमदार आशिष देशमुख आणि प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांचाही समावेश करण्यात आला आहे. अतुल लोंढे यांच्यावर दुहेरी जबाबदारी देण्यात आली असून सहा प्रवक्त्यांमध्ये त्यांचाही समावेश करण्यात आला आहे. 

अनंतराव घारड (कार्यकारी समिती) किशोर गजभिये (उपाध्यक्ष) हैदर अली दोसानी (महासचिव), कलमेश समर्थ (महासचिव), नरेंद्र जिचकार (महासचिव), नंदा पराते (महासचिव), रामकृष्ण ऊर्फ मुन्ना ओझा (महासचिव), तक्षशिला वाघधरे (महासचिव), उमाकांत अग्निहोत्री (महासचिव), विशाल मुत्तेमवार (महासचिव), रवींद्र दरेकर (महासचिव), संदेश सिंगलकर (महासचिव), संजय महाकाळकर (महासचिव), विजय बारसे (महासचिव) यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राज्यात काँग्रेसला अजूनही मोठा जनाधार असून, त्याच्या बळावरच पक्ष पहिल्या क्रमांकावर नेण्याचे स्वप्न पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाहिले आहे. पक्ष संघटना मजबूत करून आपल्या पक्षाचे अधिकाअधिक उमेदवार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी बूथ कमिट्या नेमून त्या माध्यमातून लोकांना जोडण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकरी, व्यापारी, बेरोजगारांसाठी काँग्रेस पक्ष हाच आधार आहे. अशा घटकांच्या मागण्यांवर सतत आक्रमक राहण्याची तयारी ठेवा, असा सल्ला पटोले यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिला. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in