अजिंठा लेणी विकासासाठी आराखडा करण्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांचे आश्वासन

अधिवेशनानंतर पर्यटन मंत्र्यासोबत अजिंठा लेणी परिसराची पाहणी करून तेथे आवश्यक असणाऱ्या सुविधा संदर्भात आराखडा तयार करून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल.
Bjp Leader Dr.Bhagwat karad news Dehli-Aurangabad
Bjp Leader Dr.Bhagwat karad news Dehli-Aurangabad

औरंगाबाद ः जगप्रसिध्द अजिंठा लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने दरवर्षी येत असतात. त्यांना अधिकाधिक चांगल्या सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर पर्यंटनमंत्र्यांसह आपण अजिंठा लेणीला भेट देऊन पाहणी करणार असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी सांगितले. (Union Minister of State for Finance promises to plan for development of Ajanta Caves) अजिंठा लेणीच्या विकासासाठी आराखडा तयार करून भरघोस निधी देण्याचे आश्वासन देखील कराड यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिले.

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात खासदार भागवत कराड यांना अर्थखात्याचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. (Central State Finance Minister Dr.Bhagwat Karad) त्यांच्या अर्थ खात्याचा लाभ औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा लेणी परिसराचा विकास करण्यासाठी होईल, या अपेक्षेने सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच कराड यांची दिल्लीत भेट घेतली. (Ajanta Caves, Aurangabad)

मंत्रीपद मिळाल्याबद्दल अभिनंदन करतांनाच पदाधिकाऱ्यांनी अजिंठा लेणी व परिसराच्या विकाससाठी चांगले रस्ते, पर्यंटकांची गैरसोय टाळण्यासाठी आसपासच्या भागामध्ये राष्ट्रीयकृत बॅंका व इतर सोयी-सुविधा पुरवण्या संदर्भात निवदेन दिले. सिल्लोड -सोयगाव तालुक्यात  एसआरएफ ,पंतप्रधान  सडक योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणत उत्कृष्ट रस्त्यांची कामे सुरू करून विकासकामे केली जातील असे आश्वासन कराड यांनी या शिष्टमंडळाला दिले.

या शिवाय मोठया गावांमध्ये राष्ट्रीयकृत बँका उघडण्याबाबत देखील सकारात्मक विचार केला जाईल. विदेशातील पर्यटकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही  व ऐतिहासिक  वारसा जपण्यासाठी मोठ्या  प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही कराड यांनी यावेळी सांगितले.

अधिवेशनानंतर पर्यटन मंत्र्यासोबत अजिंठा लेणी परिसराची पाहणी करून तेथे आवश्यक असणाऱ्या सुविधा संदर्भात आराखडा तयार करून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासनही कराड यांनी प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, युवा मोर्चा प्रदेश कोषाध्यक्ष अभिषेक जैस्वाल यांच्या शिष्टमंडळाला दिले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in