एनआयव्हीच्या अहवालानंतरच ‘ब्रिटन रिटर्न’ युवकाला होणार सुटी

शहरी भागात दिवसभरात ३२२, ग्रामीणला १४ असे एकूण ३३६ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे एकूण १ लाख १२ हजार ९७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्या शहरात ३ हजार २०२, ग्रामीणला ९५६ असे एकूण ४ हजार १६१ सक्रिय कोरोनाबाधित आहेत.
corona
corona

नागपूर : इंग्लंडहून नागपुरात आलेला २८ वर्षीय तरुण शहरासह गोंदिया जिल्ह्यातही फिरून आले होता. त्यामुळे उपराजधानीत भय पसरले होते. सद्यःस्थितीत हा ‘ब्रिटन रिटर्न’ युवक ठणठणीत आहे. काल पुन्हा त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. सौम्य लक्षणे असतानाही चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्याच्या नाकासह घशातील द्रव्याचे नमुने गुरूवारी विमानाने एनआयव्हीकडे पोहोचले. एनआयव्हीकडून अहवाल आल्यानंतरच रुग्णाला सुटी देण्यात येणार आहे. 

दरम्यान काल कोरोनामुळे जिल्ह्यात ७ जण दगावले असून ३५३ जणांना नव्याने बाधा झाल्याचे पुढे आले. उपराजधानीत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या बाधेने केवळ एक जण दगावला आहे. यामुळे शहरातील मृत्युदर खाली आल्याचे दिसत आहे. आज झालेल्या मृत्यूंमध्ये शहरातील १, ग्रामीणचे २, जिल्ह्याबाहेरील ४ अशा एकूण ७ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे आजपर्यंत शहरात २ हजार ६१८ मृत्यूंची नोंद झाली. शहरात दिवसभरात २२३, ग्रामीण १२६, जिल्ह्याबाहेरील ४ असे एकूण ३५३ नवीन कोरोना बाधित आढळले आहेत. 

आतापर्यंत १ लाख २१ हजार ३४६ कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. यात शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या आता ९६ हजार ३१ तर ग्रामीण २४ हजार ५५१ रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्याबाहेरील ७६४ आहेत. जिल्‍ह्यात आज पुन्हा एकदा चाचण्यांची संख्या घसरली आहे. शहरी भागात दिवसभरात ३ हजार २१३ आणि ग्रामीण भागात ८८० अशा एकूण केवळ ४ हजार ९३ चाचण्या झाल्या आहेत. दरम्यान गुरूवारी जिल्ह्यात गंभीर असे ९५० बाधित विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. तर २ हजार ८५८ कोरोनाबाधित गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. 

शहरात ९० हजार कोरोनामुक्त 
शहरी भागात दिवसभरात ३२२, ग्रामीणला १४ असे एकूण ३३६ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे एकूण १ लाख १२ हजार ९७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्या शहरात ३ हजार २०२, ग्रामीणला ९५६ असे एकूण ४ हजार १६१ सक्रिय कोरोनाबाधित आहेत. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com