उद्धव ठाकरे सत्शील मुख्यमंत्री : यशवंतराव गडाख

उद्धव ठाकरे यांच्या रुपाने महाराष्ट्राला एक सरळ, साधे मुख्यमंत्री लाभले. पदग्रहण करताच त्यांनी सरसकट कर्जमाफीचा पहिला निर्णय घेतला.
उद्धव ठाकरे सत्शील मुख्यमंत्री : यशवंतराव गडाख
yeshvantrao gadakh.jpg

नेवासे : शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यासारखे एक सत्शील व सरळमार्गी व्यक्तीमत्त्व असणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले, हे आपले भाग्यच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी केले. 

जिल्हा बॅंकेच्या संचालकपदी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार चंद्रशेखर घुले, तसेच ज्ञानेश्वर व मुळा कारखान्यांच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा गिडेगाव येथे गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

"ज्ञानेश्वर'चे अध्यक्ष व माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले, उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, "मुळा'चे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले, ऍड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, बबन भुसारी, काशिनाथ नवले, सभापती रावसाहेब कांगुणे आदी उपस्थित होते. 

मंत्री गडाख म्हणाले, "उद्धव ठाकरे यांच्या रुपाने महाराष्ट्राला एक सरळ, साधे मुख्यमंत्री लाभले. पदग्रहण करताच त्यांनी सरसकट कर्जमाफीचा पहिला निर्णय घेतला. यापूर्वी निवडणूका जवळ आल्यावर कर्जमाफीच्या घोषणा होत. मात्र, निवडणूक झाल्यावर झालेली ही पहिली कर्जमाफी आहे. जिल्हा बॅंकेचा मागील पाच वर्षांचा कार्यकाल बघता, त्यावर न बोललेलेच बरे! बॅंकेत अनेक गोष्टी दुरुस्त करण्याची गरज आहे.'' 

प्रास्ताविक सरपंच भगवान कर्डिले यांनी केले. नानासाहेब रेपाळे, नानासाहेब फाटके, भैयासाहेब देशमुख, शिवाजी कोलते, बापूसाहेब शेटे, दादासाहेब गंडाळ, प्रभाकर कोलते, नारायण लोखंडे, शिवाजी शिंदे, असिफ पठाण आदी उपस्थित होते. 

मंत्री गडाखांचा साधेपणा 

कार्यक्रमानंतर स्नेहभोजनासाठी आयोजकांनी स्वतंत्र व्यवस्था केलेली असतानाही, मंत्री शंकरराव गडाख यांनी साधेपणा दाखवत कार्यकर्त्यांसोबत पंक्तीत बसून भोजनाचा आस्वाद घेतला. मंत्री गडाख यांचा साधेपणा उपस्थितांना चांगलाच भावला. 
 

हेही वाचा..

गोविंद पानसरे स्मृती पुरस्कार का. वा. शिरसाठ यांना जाहीर 

नेवासे : शब्दगंध साहित्यिक परिषदेतर्फे कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार पिंपळगाव टप्पा (ता. पाथर्डी) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा लेखक का. वा. शिरसाठ यांना जाहीर केल्याची माहिती "शब्दगंध'चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली. 

पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी (ता. 20) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत उत्तम कांबळे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू असतील. नगर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात सकाळी हा कार्यक्रम होणार आहे. ऍड. सुभाष लांडे व स्मिता पानसरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी "शब्दगंध'च्या वेबसाइटचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले आहे. 

Edited By - Murlidhar Karale

Related Stories

No stories found.