उदयनराजेंनी घेतली पोलिसांच्या आरोग्याची काळजी

पोलिस आपला जीव धोक्यात घालून जनतेसाठी रस्त्यावर थांबून आहेत. दिवसरात्र रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याची काळजी मात्र, कोणालाच नाही.
Took Care Of Police Health
Took Care Of Police Health

सातारा :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन महिन्यांपासून स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेसाठी रस्त्यावर थांबणाऱ्या पोलिसांची काळजी कोणालाच नाही. पण साताऱ्याचे भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचे वाटप केले.


या गोळ्या त्यांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, डॉ. प्रकाश इगावे, डॉ. राजेश राजे, हरिष पाटणे, विनोद कुलकर्णी, माजी सभापती सुनील काटकर तसेच उदयनराजे मित्र समुहाचे पदाधिकारी उपस्थित होते. 
 
हेही वाचा :  तीन लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले; पण पैसा कोठून आणणार ते नाही सांगितले...

:
गेल्या दोन महिन्यांपासून साताराशहरासह जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य जनता कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी घरातच
थांबून आहे. मात्र, पोलिस आपला जीव धोक्यात घालून जनतेसाठी रस्त्यावर थांबून आहेत. दिवसरात्र रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याची काळजी मात्र, कोणालाच नाही. पोलिसांना ऊन, वारे व पावसात कर्तव्य बजावावे लागत आहे. 

सध्याच्या परिस्थितीत त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा अधिक धोका आहे. संसर्ग होऊ नये व त्यांची प्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी सामाजिक बांधिलकी आणि पोलिसांप्रती असलेली आपुलकी दाखवत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज रोग प्रतिकारशक्ती वाढीच्या गोळ्या पोलिसांना दिल्या.

या गोळ्यांचे बॉक्स त्यांनी पोलिस  अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी तेजस्वी सातपुते यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करून जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच आगामी
काळात पोलिस दलाला वाटेल ती मदत करण्याचा शब्द दिला. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com