साताऱ्यात दोघांचा मृत्यू, २७ नवे रूग्ण सापडले

आज दोघांचा मृत्यू झाला असला, तरी दोघांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. त्यामध्ये 75 वर्षीय महिला व 24 वर्षांच्यायुवकाचा समावेश आहे. जिल्ह्यातून बरे होऊन जाणाऱ्यांची संख्या 122 झाली आहे.
corona satara
corona satara

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची साखळी तुटेना झाली असून गेल्या चार पाच दिवसांपासून रूग्ण संख्या वाढत आहे. आज रात्री उशीरा 27 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली. त्यामुळे बाधितांचा आकडा ३३६ वर गेला आहे. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे रूग्णांचा आकडा वाढत असतानाच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रूग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन कोरोनाबाधितांचा आज मृत्यू झाला. हे दोघेही वाई तालुक्‍यातील असून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या नऊ झाली आहे. 

गेल्या 24  तासांत 244 जणांना उपचारासाठी जिल्ह्यातील विविध विलगीकरण कक्षात दाखल करण्यात करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या
वेगाने वाढत आहे.

गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल शंभरने वाढली. त्यामुळे त्यांच्या जवळच्या संपर्कातील शोधणे, त्यांना क्वारंटाइनकरणे व अन्य उपाययोजना राबविण्यात प्रशासनाची दमछाक होत आहे. आज सायंकाळपर्यंत कोणीही कोरोनाबाधित झाल्याचा अहवाल आला नव्हता. मात्र; रात्री पावणेदहा वाजता 27 संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये वाई तालुक्यातील अकरा, जावळी तालुक्यातील सहा, महाबळेश्वर दोन, पाटण दोन, कऱ्हाड तालुक्यातील एका रूग्णाचा समावेश आहे.
 
आसले (ता. वाई) येथील एक ज्येष्ठ नागरिक मुंबईहून प्रवास करून आल्याने त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांच्या संपर्कातील एक जण कोरोनाबाधित निघाला. त्यामुळे त्यांच्याही घशाच्या स्त्रावाचे नमुने घेण्यात आले होते. काल (ता. 24) त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांच्यावर क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच आज त्यांचा मृत्यू झाला. 

तसेच जांभळी (ता. वाई) येथील 52 वर्षीय पुरुषाचाही उपचार  सुरू असताना मृत्यू झाला. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. मुंबईवरून आल्यामुळे त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांना त्रास होऊ लागल्यामुळे काल जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. परंतु त्यांची प्रकृती खालावत गेली आणि दुपारी त्यांचा मृत्यू झाला. रात्रीउशीरा त्यांच्याही अहवाल कोरोनापॉझिटिव्ह आला

. या दोन्ही कोरोनाबाधित रुग्णांवर नियमावलीनुसार संगममाहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोघांचाही मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे रात्री आलेल्या अहवालामुळे स्पष्ट झाले. गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील 244 रुग्णांना कोरोनाचे संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे, तर 184 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अद्यापही 453 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. 

दरम्यान, आज दोघांचा मृत्यू झाला असला, तरी दोघांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. त्यामध्ये 75 वर्षीय महिला व 24 वर्षांच्या
युवकाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातून बरे होऊन जाणाऱ्यांची संख्या 122 झाली आहे. कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमधून या दोन्ही रुग्णांना टाळ्यांच्या गजरात
घरी सोडण्यात आले. 

एक लाख सातारकर स्वगृही परतले 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्य व केंद्रशासित प्रदेश, राज्याच्या इतर जिल्ह्यातून कालपर्यंत (ता. 24) ई-पास घेऊन एक लाख नऊ हजार 604
नागरिकांनी चेक पोस्टवरून सातारा जिल्ह्यात प्रवेश केला आहे.

आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, ओडिसा, कर्नाटक, केरळ, गुजरात, गोवा, झारखंड, तामीळनाडू, तेलंगणा, पंजाब, पश्‍चिमबंगाल, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि हरियानामधून 2,184 नागरिकांनी प्रवेश केला आहे. 1,07,420 नागरिक हे इतर जिल्ह्यातून आलेत. सातारा जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची तालुकानिहाय आकडेवारी : कऱ्हाड- 12671, कोरेगाव- 6113, खंडाळा- 4804, खटाव- 11676, जावळी- 8192, पाटण- 12463, फलटण- 7457, महाबळेश्वर- 6588, माण- 10341, वाई- 8985, सातारा- 20314. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com